क्रिकेट(Cricketer) विश्वातून एक वेगळीच बातमी पुढे येत आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका क्रिकेटपटूला आयसीसी सापरधेत चोरी करताना पकडलं गेलं आहे. आता त्याला तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

जर्सी येथे सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप चॅलेंज लीगदरम्यान पापुआ न्यू गिनीचा विकेटकीपर किपलिन डोरिगा चोरीच्या आरोपात अडकला आहे. सेंट हेलियर येथे झालेल्या या घटनेनंतर त्याला पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केलं. सुनावणीत त्याला दोषी ठरवण्यात आलं असून न्यायालयाने त्याला थेट तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
२५ ऑगस्टच्या सकाळी डोरिगावर चोरीचा आरोप ठेवण्यात आला. बुधवारी जर्सीच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावणी झाली. प्रकरण गंभीर असल्याने हे प्रकरण रॉयल कोर्टात वर्ग करण्यात आलं. त्यामुळे त्याला जामीनही मिळाला नाही. आता तो २८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहे.
२९ वर्षीय डोरिगा(Cricketer) हा पापुआ न्यू गिनी संघाचा वरिष्ठ खेळाडू आहे. त्याने आपल्या देशासाठी ३९ वनडे आणि ४३ टी२० सामने खेळले असून २०२१ आणि २०२४ टी२० विश्वचषकातही तो संघाचा भाग होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर सर्व फॉरमॅटमध्ये मिळून हजाराहून अधिक धावा आहेत.
नुकत्याच खेळल्या गेलेल्या डेनमार्कविरुद्धच्या सामन्यात त्याने ८४ चेंडूत ६८ धावा केल्या होत्या, तर कुवेतविरुद्धच्या सामन्यात तो १२ धावांवर बाद झाला होता. मात्र दोन्ही सामन्यांत पापुआ न्यू गिनीला पराभवाचा सामना करावा लागला.

या घटनेनंतर क्रिकेट पापुआ न्यू गिनी बोर्डाने अधिकृत प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केलं की हा खेळाडूचा वैयक्तिक मामला असून संघाच्या कामगिरीवर त्याचा परिणाम होणार नाही. बोर्डाचं लक्ष फक्त संघाला पुढे नेण्यावर आहे आणि मैदानाबाहेरचे वाद संघाच्या बांधिलकीवर परिणाम करू देणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा :
सोनाक्षी सिन्हाच्या ‘Jatadhara’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री
ISRO देणार मोफत ट्रेनिंग! शिक्षणही आणि थोडेफार पैसेही; कसे करावे अर्ज?
रस्त्यावरच अंघोळी अन् तिथेच आराम… Maratha Reservation Morcha चे Video Viral