मुंबई : रिलायन्स जिओने(Jio) आपल्या 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने ‘जिओ फ्रेम्स’ नावाचे एआय पॉवर्ड स्मार्ट ग्लासेस सादर केले असून यामुळे मेटाच्या रे-बॅन स्मार्ट ग्लासेस आणि लेन्सकार्टच्या नव्या गॅजेट्सना थेट स्पर्धा मिळणार आहे.

‘जिओ फ्रेम्स’मध्ये फोटो आणि व्हिडिओ कॅप्चरिंग, कॉलिंग, म्युझिक प्लेबॅक अशी सर्व आधुनिक वैशिष्ट्ये आहेत. इनबिल्ट एचडी कॅमेरामुळे व्हॉइस कमांड्स आणि वापरकर्त्याच्या हालचालींवरून उच्च प्रतीचे फोटो आणि व्हिडिओ सहज रेकॉर्ड करता येतील.
या ग्लासेसची खासियत म्हणजे ‘जिओ(Jio) एआय क्लाउड’. या फिचरमुळे घेतलेले फोटो आणि व्हिडिओ आपोआप क्लाउडवर सेव्ह होतात आणि मोबाईल किंवा पीसीवर लॉगिन करून पाहता येतात. त्याशिवाय ‘जिओ व्हॉइस एआय’ नावाचा व्हॉइस असिस्टंट यामध्ये देण्यात आला असून तो दैनंदिन प्रश्न, माहिती किंवा रेसिपीपासून ते इतर अनेक गोष्टींची उत्तरे देऊ शकतो.
भारतीय वापरकर्त्यांच्या सोयीसाठी हे स्मार्ट ग्लासेस अनेक स्थानिक भाषांना सपोर्ट करतात, ज्यामुळे भाषांतर आणि संवाद अधिक सोपा होईल. तसेच ओपन-इअर स्पीकर्समुळे कॉलिंग आणि संगीत ऐकण्याचा अनुभवही अधिक चांगला मिळणार आहे.
जिओने (Jio)जाहीर केले की त्यांचे ग्राहकसंख्या आता 50 कोटींच्या घरात पोहोचली आहे, तर दर महिन्याला 10 लाख नवे एअरफायबर ग्राहक त्यांच्यात सामील होत आहेत. जिओ फ्रेम्सची किंमत लवकरच जाहीर होणार असून, हे ग्लासेस भारतीय बाजारपेठेत एक गेमचेंजर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
सोनाक्षी सिन्हाच्या ‘Jatadhara’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री
ISRO देणार मोफत ट्रेनिंग! शिक्षणही आणि थोडेफार पैसेही; कसे करावे अर्ज?
रस्त्यावरच अंघोळी अन् तिथेच आराम… Maratha Reservation Morcha चे Video Viral