जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचे पीएफ खाते(account) आहे, तर लवकरच तुमच्यासाठी मोठा बदल येणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ‘EPFO 3.0’ नावाचा नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे. हा प्लॅटफॉर्म ८ कोटींहून अधिक सदस्यांना थेट फायदा देईल.या नव्या प्लॅटफॉर्मद्वारे पीएफशी संबंधित अनेक प्रक्रिया खूप सोप्या होतील. क्लेमसाठी लांबलचक प्रक्रिया संपणार असून, ओटीपी आधारित पडताळणी करून तुम्ही घरबसल्या क्लेम करू शकाल आणि त्याचा स्टेटसही ऑनलाइन ट्रॅक करू शकाल

EPFO 3.0 चा इंटरफेस अतिशय वापरकर्ता-अनुकूल असेल. पीएफ शिल्लक, स्टेटमेंट आणि इतर माहिती सहज पाहता येईल.भविष्यात तुम्ही तुमचा पीएफ निधी एटीएमद्वारे काढू शकाल. त्यासाठी तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर सक्रिय असणे आवश्यक आहे. EPFO आता यूपीआयसोबत जोडले जाणार आहे, त्यामुळे तुम्ही थेट UPI ॲप्सद्वारे निधी हस्तांतरित करू शकाल.

वेगवान आणि पारदर्शक प्रक्रिया: क्लेम सेटलमेंट अधिक जलद आणि पारदर्शक होईल, ज्यामुळे पैसे वेळेवर मिळतील.EPFO 3.0 लाँचमध्ये विलंब झाला कारण हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे विश्वासार्ह आणि सुरक्षित बनवणे गरजेचे होते. कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आयुष्याशी जोडलेला असल्यामुळे कोणत्याही तांत्रिक त्रुटीला जागा नाही. यासाठी चाचणी, फीडबॅक आणि सुधारणांची प्रक्रिया सतत सुरू आहे.

सध्या पीएफ काढण्यासाठी सदस्यांना EPFO वेबसाइटवर लॉगिन करून Form 19, 10C किंवा 31 भरावा लागतो आणि आधारवर आधारित ओटीपीद्वारे पडताळणी होते. केवायसी पूर्ण आणि बँक तपशील योग्य नसल्यास क्लेम नाकारला जाऊ शकतो(account).

हेही वाचा :

मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू, जरांगेंच्या उपोषणापूर्वी मोठी दुर्घटना

हायकोर्टजवळ सुसाट कार दुभाजकावर धडकून अपघात

“एआय शेतीसाठी ठरणार गेमचेंजर; ऊस उत्पादनात 40 टनांनी वाढ

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *