क्रिकेटर (Cricketer)युजवेंद्र चहलची पूर्व पत्नी आणि डान्सर-कोरिओग्राफर धनश्री वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. घटस्फोटानंतर जवळपास पाच महिन्यांनी तिने आपल्या नातेसंबंधांबद्दल आणि आयुष्याविषयी मनमोकळं बोलत लोकांच्या कुतूहलाला पूर्णविराम दिला आहे.

फराह खानच्या युट्यूब व्लॉगमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झालेल्या धनश्रीने सांगितलं की, “मी आणि युजी (चहल) दोघांनीही आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत आणि एकमेकांसाठी चांगलं व्हावं अशीच दोघांची इच्छा आहे.” तिने हेही सांगितले की चहल तिला प्रेमाने ‘माँ’ म्हणायचा आणि तो नेहमीच खूप प्रेमळ राहिला आहे.
धनश्रीने लग्नानंतरचा तिचा प्रवास किती कठीण होता, याविषयीही सांगितलं. ती म्हणाली, “करिअर आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल साधणं खूप अवघड होतं. गुरुग्राम आणि मुंबई दरम्यान सतत प्रवास करणं, सगळी जबाबदारी सांभाळणं सोपं नव्हतं. पण मी माझं 100 टक्के दिलं.”
तिने हेही मान्य केलं की घटस्फोटामुळे तिच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला, मात्र लोकांच्या सततच्या टीकेमुळे तिला मानसिक आघात बसला. तरीही तिने स्पष्ट केलं की आता तिचे आणि चहलचे (Cricketer)मतभेद मिटले आहेत.

मार्च महिन्यात दोघांचा अधिकृत घटस्फोट झाला, परंतु त्यामागील कारण त्यांनी सार्वजनिकरित्या सांगितले नव्हते. चर्चेनुसार, राहण्याच्या ठिकाणावरून दोघांमध्ये मतभेद झाले होते. चहल हरियाण्यात कुटुंबासोबत राहू इच्छित होता, तर धनश्री मुंबईत करिअरकेंद्रित जीवन जगण्याचा आग्रह धरत होती.धनश्रीच्या या स्पष्टोक्तीनंतर दोघांमधील नातेसंबंधावरील चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, चाहत्यांना मात्र अजूनही त्यांच्या वेगळेपणाची खंत आहे.
हेही वाचा :
१७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा….
प्रसिद्ध शास्त्रीय गायकाचा घटस्फोट, 17 वर्षाचा संसार मोडला
साखर खाल्ल्यामुळे केस लवकर पांढरे होतात का?