मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी यावरून राजकीय वादळ उठलं आहे. उपोषण संपल्यानंतर आज वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीने जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला(politics).

त्यांनी म्हटलं, “समाजाच्या जीवावर दिशाभूल करणं, आई-बहिणींवर घाणेरडे शब्द वापरणं हे नीचपणाचं वर्तन आहे. फक्त एक फोर्स उभी करून महोरक्या म्हणून समोर यायचं, लोकांना खोट्या आश्वासनांनी फसवायचं, हा जरांग्यांचा डाव आहे.”
तसेच, “मराठा समाज बांधवांनो, तुम्ही अभ्यास करा. मोदीजींनी दिलेलं EWS आरक्षण खरं आहे(politics). त्या आरक्षणाचा अनेकांना फायदा झाला आहे. जरांगे पाटील यांच्या खोट्या गोष्टींना बळी पडू नका,” असा इशाराही त्यांनी दिला.
याचबरोबर त्यांनी जरांगे पाटलांवर थेट शब्दात टीका करताना म्हटलं, “आझाद मैदान कोर्टाने रिकामं करायला सांगितलं तरी तू गुलाल उधळून दिशाभूल करतोस. मी घेतल्याशिवाय राहणार नाही, पण ते संविधानाने. कायदा आणि संविधान जे देईल तेच घेऊ. त्याच्या बाहेर कुणीही आरक्षण देऊ शकत नाही.”

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या आंदोलनाचं श्रेय “हे माझं नाही, संपूर्ण मराठा समाजाचं आहे” असं सांगत मराठा समाजाच्या ऐक्याचं महत्त्व अधोरेखित केलं.
हेही वाचा :
मला मराठा समाजाचे वाटोळे करायचे असते तर 58 लाख…. जरांगे कडाडले….
प्रेयसीचा फोन व्यस्त, मग काय… पठ्ठ्याने संपूर्ण गावाचीच वीज कापली, विजेच्या खांब्यावर चढला अन्…
4 मुलांची आई 26 वर्षीय मुलाच्या प्रेमात झाली वेडी , असा झाला शेवट…