तुम्ही कधी विचार केला आहे का, १२५ वर्षांपूर्वीचं जग(world) कसं असेल? घोडागाड्यांचा खटखटाट, रस्त्यावरून धावणाऱ्या सायकली, आणि साध्या वेशभूषेत जगणारे लोक… हा अनुभव आता प्रत्यक्ष व्हिडिओतून पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर मोहित कुमार यांनी शेअर केलेला दुर्मिळ व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ अंदाजे १९०० च्या सुमारास शूट झालेला असून त्यात त्या काळातील जीवनशैली, शहराचं स्वरूप आणि लोकांची साधी राहणीमानं टिपली गेली आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या घोडागाड्या, हातगाड्या, सायकली आणि आनंदी लोकांचा साधा जीवनप्रवाह पाहून नेटकरी भारावून जात आहेत.
सर्वात विशेष म्हणजे हा व्हिडिओ अत्यंत स्पष्ट आणि रंगीत स्वरूपात उपलब्ध आहे. त्यामुळे तो फक्त कृष्णधवल आठवणीसारखा वाटत नाही, तर त्या काळात प्रत्यक्ष घेऊन जाणारा जिवंत अनुभव देतो. मोहित कुमार यांनी हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं आहे, “१२५ वर्षांपूर्वीचं जग पाहण्याची ही अनोखी संधी सोडू नका. हा व्हिडिओ तुम्हाला इतिहासाच्या पानांत हरवून टाकेल.”
7. Vienna, 1896 pic.twitter.com/pJiCCltPwH
— Mohit Kumar (@mohitkumarbhai) September 2, 2025
आतापर्यंत या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उत्साहवर्धक आहेत. काहींनी त्या काळातील साधेपणाचं कौतुक केलं, तर काहींनी तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर आश्चर्य व्यक्त केलं.इतिहासप्रेमींसाठी हा व्हिडिओ एक अनमोल ठेवा ठरत असून, “१०० वर्षांपूर्वीचं जग प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव” म्हणून लोक याला खूप पसंती देत आहेत(world).
हेही वाचा :
मला मराठा समाजाचे वाटोळे करायचे असते तर 58 लाख…. जरांगे कडाडले….
प्रेयसीचा फोन व्यस्त, मग काय… पठ्ठ्याने संपूर्ण गावाचीच वीज कापली, विजेच्या खांब्यावर चढला अन्…
4 मुलांची आई 26 वर्षीय मुलाच्या प्रेमात झाली वेडी , असा झाला शेवट…