दररोज सोशल मीडियावर अनेक नवनवीन आणि आपल्याला अचंबित करणारे व्हिडिओज (video)व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला आश्चर्यचकित करतात तर कधी हसवतात तर कधी भावुक करून सोडतात. इथे नेहमीच काही ना काही घडत असतं आणि असाच एक नवीन प्रकार आता इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रेयसीचा फोन बीजी काय लागला पठ्ठ्याने थेट मोठा पराक्रमच केला. त्याचा हा पराक्रम इतका आश्चर्यकारक होता की पाहून प्रेयसीला पण धडकी भराली असावी. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक माणूस विजेच्या खांबावर चढताना दिसत आहे. तो कोणत्याही तयारीने त्यावर चढलेला नाही. त्याच्या हातात एक कटर दिसत आहे ज्याने तो एकामागून एक वेगवेगळ्या तारा कापत आहे. हळूहळू तो ३ तारा कापतो. आता व्हिडिओ व्हायरल होत आहे कारण त्यासोबतचा दावा खूप विचित्र आहे. व्हिडिओमध्ये(video) असा दावा केला जात आहे की या मुलाच्या प्रेयसीचा फोन व्यस्त लागत होता ज्यामुळे मुलाने रागात येऊन त्याने संपूर्ण गावाची वीज कापली. व्हिडिओत करण्यात आलेला हा दावा कितपत खरा आहे याची पुष्टी अद्याप झाली नसली तरी घटनेचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो खरा आशिक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे भाव लाइट चालू कर, मी अजून फोन पण चार्ज नाय केला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मुलीचं चक्कर बाबू भैया,मुलीचं चक्कर”.

हेही वाचा :

4 मुलांची आई 26 वर्षीय मुलाच्या प्रेमात झाली वेडी , असा झाला शेवट…

शिवभोजन थाळीही बंद होण्याच्या मार्गावर….

कोल्हापुर: प्रेमविवाह केला म्हणून सेवानिवृत्त सैनिकाने बहिणीच्या नवऱ्यावर झाडली गोळी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *