बॉलिवूडमधील(Bollywood) सर्वात चर्चेत राहिलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा. त्यांच्या नात्याबद्दल अनेक अफवा पसरल्या, पण दोघांनीही कधीही उघडपणे भाष्य केले नाही. मात्र, प्रियांकाने नकळत एका टीव्ही शोमध्ये त्यांच्या नात्याचा इशारा दिल्याचा दावा केला जातो.

हॉलिवूड शो ‘डर्टी लॉन्ड्री’ मध्ये प्रियांकाने सांगितलं होतं की, तिच्याकडे असलेलं एक खास जॅकेट तिच्या एक्स बॉयफ्रेंडचं आहे. हे जॅकेट तिने ब्रेकअपनंतरही स्वतःजवळच ठेवलं होतं. मजेशीर बाब म्हणजे, एक्स बॉयफ्रेंडने परत मागितलं तरी प्रियांकाने ते देण्यास नकार दिला होता.
याच खुलाशानंतर एका सोशल मीडिया युजरने प्रियांकाला टॅग करून लिहिलं – “प्रियांका चोप्राने अखेर जॅकेटची कहाणी सांगून शाहरुख खानसोबतच्या नात्याची कबुली दिली तर.” आश्चर्य म्हणजे, प्रियांकाने ही पोस्ट लाईक केली. त्यामुळे चाहत्यांमध्ये शंका अधिकच वाढली की खरंच शाहरुखच प्रियांकाचा एक्स होता का?

या घटनेनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा प्रियांका-शाहरुखच्या नात्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. बॉलिवूडमधून (Bollywood)अचानक हॉलिवूडमध्ये वळण घेण्यामागेही याच वादग्रस्त नात्याचं कारण असल्याचं म्हटलं जातं.
हेही वाचा :
Maratha-OBC वाद पेटणार, नेत्यांचा राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा….
सरकारच्या GR मधून मराठा आणि ओबीसी दोघांची फसवणूक….
Instagram आणतेय TikTok सारखे PiP फिचर…