काल महराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी सोडले आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने अर्थात राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र आता हा जीआर काढल्यावर ओबीसी (OBC)नेते आक्रमक झाले आहेत.

राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र आता सरकारच्या जीआरविरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी नेते या निर्णयाविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन करण्याची शक्यता आहे. दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाचा जीआर फाडला असल्याचे समजते आहे.
सरकारने काढलेल्या जीआरनुसार मराठा समाजाला ओबीसी(OBC) प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यात मराठा आरक्षणचा जीआर फाडला आहे. हा निर्णय संविधानविरोधी असल्याचे हाके म्हणाले.
हेही वाचा :
Instagram आणतेय TikTok सारखे PiP फिचर…
कुत्रा भूंकल्याने दुचाकीमागे बाधलं अन् गावभर…, अमानुष Video Viral
अरुण गवळी १८ वर्षांनंतर कारागृहाबाहेर…..