रील्स (Reels)पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंस्टाग्राम लवकरच एक असे फिचर आणत आहे, ज्यामुळे युजर्सना रील्स बंद न करता इतर ॲप्स वापरता येतील. याचाच अर्थ, मेसेज पाठवणे असो किंवा ऑनलाइन शॉपिंग, आता तुम्ही हे सर्व काम रील्स पाहता-पाहता करू शकाल.

इंस्टाग्राममध्ये टिकटॉकसारखे पिक्चर-इन-पिक्चर फिचर येणार आहे. सध्या या फिचरची चाचणी सुरू असून, येत्या काही आठवड्यांत ते युजर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हे फिचर सुरु केल्यावर, तुम्ही इंस्टाग्राम ॲपमधून बाहेर पडलात तरीही एका छोट्या विंडोमध्ये रील्स सुरूच राहील. युजरला सेटिंग मेनूमधून हे फिचर चालू किंवा बंद करण्याचा पर्याय मिळेल.

या नवीन फिचरमागे इंस्टाग्रामचा मुख्य उद्देश युजर्सना जास्त काळ आपल्या प्लॅटफॉर्मवर व्यस्त ठेवणे आणि त्यांच्या सहभागाला (एंगेजमेंट) प्रोत्साहन देणे हा आहे. टिकटॉकवर हे फिचर आधीपासूनच उपलब्ध आहे आणि आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर इंस्टाग्राम युजर्ससाठीही PiP मोड येत आहे. यामुळे रील्स पाहण्याचा अनुभव अधिक चांगला होणार आहे.

आजच्या काळात शॉर्ट व्हिडिओमुळे लोकांचे लक्ष विचलित होत आहे आणि त्यांना एकाच वेळी अनेक कामे करण्याची इच्छा असते. अशा परिस्थितीत, या फिचरमुळे लोक रील्स(Reels) पाहण्यासोबतच इतर फोनवरील कामेही करू शकतील. आपल्या प्लॅटफॉर्मवर युजरला जास्तीत जास्त वेळ टिकवून ठेवण्याची कंपनीची ही एक रणनीती आहे. भारतात टिकटॉकवर बंदी आहे, पण अनेक देशांमध्ये इंस्टाग्रामला टिकटॉककडून जोरदार स्पर्धा मिळत आहे. यामुळेच प्रतिस्पर्धकांपेक्षा पुढे राहण्यासाठी कंपनीवर मोठा दबाव आहे, आणि हे नवीन फिचर त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे.

हेही वाचा :

अरुण गवळी १८ वर्षांनंतर कारागृहाबाहेर…..

125 वर्षांपूर्वी जग कसं होतं? कल्पनेपलीकडचा दुर्मिळ व्हिडिओ

जरांग्या तू कोण आहेस? आई-बहिणीवरुन… गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीचे शब्द

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *