बीड : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या पदाधिकारी नारायण शिंदेवर बीड शहरातील एका शिक्षिकेवर (teacher)लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी आतापर्यंत फरार आहे.

महिलेकडून झालेल्या तक्रारीनुसार, नारायण शिंदेने तिला पुण्यात फ्लॅट घेऊन देतो असे सांगून तब्बल १ कोटी १० लाख रुपये घेतले. नंतर तक्रार केल्यास तिला जीवाला धोका असल्याची धमकीही दिली गेली.
महिलेकडून(teacher) केलेल्या तक्रारीनंतर आरोपी शिंदे यांनी प्रकरण मिटवण्यासाठी आमदार धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख खुन प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांची मदत घेतली. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी परळी येथील कार्यालयात बैठक झाली, जिथे आरोपी शिंदे, धनंजय मुंडे, वाल्मीक कराड, अविनाश नाईकवाडे, बुधवंत आणि महिलाही उपस्थित होती.
बैठकीत आरोपी शिंदेने भरपाई रक्कम अडीच कोटी रुपये देण्याचे वचन दिले होते, परंतु तो वचन पूर्ण केला नाही, अशी महिलेने तक्रारीत नोंद केली आहे.शिवाजीनगर पोलिस आता आरोपी नारायण शिंदेचा शोध घेऊन तपास सुरू ठेवत आहेत.
हेही वाचा :
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि X वर बंदी; नेमकं कारण काय?
खडकावर बसून रडताना दिसली खरीखुरी जलपरी…..Video Viral
पती बाजारातून समोसे आणायला विसरला म्हणून पत्नीकडून बेदम मारहाण