कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या वातावरणात शहर हादरवणारी घटना घडली. चेष्टा-मस्करीतून सुरू झालेला वाद इतका पेटला की एका मित्राने दुसऱ्या मित्राचा चाकूने गळा चिरून खून (Murder)केला. गुरुवारी सकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.मोहन पवार आणि चंद्रकांत शेळके यांच्यात चाळीस वर्षांहून अधिक जुनी मैत्री होती. मात्र, किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने या मैत्रीचे रूपांतर हत्येत झाले.

गुरुवारी सकाळी शेळके हा पवार यांच्या हनुमाननगरातील घरी गेला. बोलताना जुन्या घटनांचा संदर्भ निघाला आणि वाद वाढला. त्यात पवार यांनी आईवरून केलेल्या शिवीगाळीमुळे शेळके संतप्त झाले. रागाच्या भरात त्यांनी घरातील चाकू उचलून पवार यांच्यावर हल्ला केला. गळ्यावर वार झाल्याने पवार जागीच कोसळले आणि रक्ताच्या थारोळ्यात प्राण सोडले.हल्ल्यानंतर घाबरलेल्या शेळके याने घरातून पळ काढला. दरम्यान, समईला धक्का लागून घरात आग लागली. शेजाऱ्यांनी धुराचे लोट पाहून घरात धाव घेतली असता पवार यांचा मृतदेह दिसून आला.
माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजीव झाडे घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला आणि रात्री उशिरा त्याला ताब्यात घेण्यात आले. प्रारंभी हा खून (Murder)चोरीसाठी झाल्याचा संशय व्यक्त होत होता; मात्र तपासात खरी हकीकत उघडकीस आली.मोहन पवार हे रिक्षा व्यावसायिक होते. पत्नीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले असून ते मुलगा पुष्कराजसोबत राहत होते. या प्रकरणी पुष्कराज पवार यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
हेही वाचा :
मुलगी गाडीसह हवेत उडाली अन् थेट जमिनीवरच आदळली Video Viral
पाण्याच्या बाटलीचं झाकण फक्त रंग नाही, आरोग्याचं गुपित सांगतं!
हवामान विभागाकडून मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्याची…