उत्तर प्रदेशात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ग्रेटर नोएडातील राबुपुरा परिसरात एका जावयाने आपल्या विधवा सासूवर बलात्कार केला. एवढेच नव्हे तर, तिचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून त्याद्वारे वारंवार धमकावत अत्याचार केला. आरोपी जावई हा लष्करातील जवान असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे(hotel).

एप्रिल महिन्यात पीडित महिला आपल्या जावयासोबत कारमधून दिल्लीला जात होती.जावयाने तब्येत बिघडल्याचा बहाणा करत कार हॉटेलमध्ये(hotel) नेली.हॉटेलमध्ये कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार केला.बेशुद्धावस्थेत तिचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले.त्यानंतर या व्हिडिओंचा वापर करून वारंवार धमक्या देत अत्याचार सुरू ठेवले.
पीडितेच्या सांगण्यानुसार, आरोपीने तिला धमकावत तिच्या मालमत्तेची कागदपत्रेही ताब्यात घेतली. आपल्या मुलीचे वैवाहिक जीवन बिघडू नये या भीतीने ती बराच काळ गप्प राहिली. परंतु, त्रास असह्य झाल्यानंतर तिने अखेर धैर्य दाखवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपास वेगाने सुरू आहे. आरोपीच्या शोधासाठी पथक कार्यरत आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार.. उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली तारीख
घरबसल्या दरमहा मिळतील हजारो रुपये, या योजना जाणून घ्या
‘या’ मंत्र्याने नातवासाठी खरेदी केली देशातील पहिली टेस्ला कार!