कोणत्याही देवाची पूजा करताना देवाच्या चरणी (god)फळे अर्पण करणे हे भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. पण हे बऱ्याच जणांना माहित नसेल की सर्व फळांमध्ये अशी दोन फळे आहेत ज्यांना सर्वात शुद्ध आणि पवित्र मानलं जातं. ही दोन फळे देवाला अर्पण करणे सगळ्यात जास्त पवित्र मानलं जातं. कोणती आहेत ही दोन फळे?

कोणत्याही देवाची पूजा करताना देवासमोर नेहमी(god) फळे ठेवली जातात. कारण नैवद्याप्रमाणेच फळे देखील पूजेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. पण अनेकांना ही गोष्ट माहित नसेल की फळांमध्ये देखील अशी दोन फळे आहेत जी देवाला अर्पण करण्यासाठी सर्वात शुद्ध मानली जातात.

ही दोन फळे आहेत…
ही दोन फळे म्हणजे नारळ आणि केळी. होय या दोन फळांना पूजेत विशेष स्थान आहे. जसं की दुर्गा देवीच्या पूजेत किंवा कोणत्याही देवीची पूजा करताना नारळ सर्वात जास्त अर्पण केला जातो. दुसरीकडे, भगवान विष्णूच्या पूजेत केळी अर्पण करणे आवश्यक आहे. खरं तर, कोणत्याही देवाच्या पूजेत ही दोन्ही फळे सर्वात शुद्ध मानली जातात. यामागे कारण आहे ते ही दोन्ही फळे वाढवण्याची पद्धत.

फळांचे धार्मिक महत्त्व काय आहे?
केळी हे पवित्र आणि शुद्ध फळ मानले जाते कारण त्याच्या झाडाचा प्रत्येक भाग वापरण्यायोग्य असतो. केळीचे पान, देठ, फूल आणि फळ. केळीच्या झाडाला हिंदू धर्मात कल्पवृक्ष म्हणतात. सर्व इच्छा पूर्ण करणारे झाड. नारळाचे फळ देवाला अर्पण केल्यानंतर ते फोडले जाते. याचा अर्थ असा की आपण आपला बाह्य अहंकार काढून टाकत आहोत आणि आपले अंतर्मन देवाला समर्पित करत आहोत.

हे फळ भगवान शिवाचे रूप मानले जाते.
नारळावरील तीन डोळे भगवान शिवाच्या तीन डोळ्यांशी संबंधित असतात असं म्हटलं जातं. हे फळ भगवान शिवाचे रूप मानले जाते. म्हणूनच भगवान शंकरांना देखील नारळ अर्पण केला जातो आणि प्रत्येक पूजेमध्ये नारळ ठेवला जातो.

ही दोन फळे अर्पण करण्यामागील कारणे
केळी आणि नारळ ही दोन फळे आहेत जी खाल्ल्यानंतर फेकून दिल्यास पुन्हा वाढत नाहीत. साधारणपणे, सर्व फळांमध्ये बिया असतात. जर ते खाल्ले आणि फेकून दिले तर झाड पुन्हा वाढते. पण जर केळी किंवा त्याची साल फेकून दिली तर त्यापासून पुन्हा कोणतेही झाड वाढत नाही.

दोन्ही फळे मुक्ती किंवा मोक्ष दर्शवतात
जर नारळ फोडून फेकून दिला तर त्याच्या फळांपासून किंवा सालींपासून कोणतेही झाड वाढत नाही. ही दोन्ही फळे मुक्ती किंवा मोक्ष दर्शवतात. म्हणून, ही दोन फळे अर्पण करून, व्यक्ती जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्तीसाठी देवाकडे प्रार्थना करतो असं त्याचा अर्थ मानला जातो.

म्हणून यांना शुद्ध फळे म्हटलं जातं
सहसा जेव्हा आपण कोणतेही फळ खातो तेव्हा त्याचे बी फेकून दिले जाते. किंवा पक्षी या बिया खातात आणि त्यांच्या विष्ठेतून त्या बिया वेगवेगळ्या ठिकाणी रुजल्या जातात ज्यामुळे झाडे तयार होतात. पण केळी आणि नारळ ही अशी फळे आहेत जी बियांपासून वाढत नाहीत. केळीला देठाद्वारे लावावे लागते आणि नारळ संपूर्णपणे लावावा लागतो. आणि तेव्हाचे त्यांची रोपे येतात. म्हणून, ही फळे शुद्ध मानली जातात.

ऋग्वेदातही उल्लेख सापडतो
केळी आणि नारळ यांचा ऋग्वेदात देखील उल्लेख आहे. जो सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. त्यामुळे कुठे तरी तेव्हापासूनच या दोन फळांना विशेष महत्त्व आहे. म्हणून ही दोन्ही फळे देवाला अर्पण करण्यासाठी सर्वात शुद्ध आणि पवित्र मानली जातात.

हेही वाचा :

पर्यटकांची बस थेट १००० फूट खोल दरीत कोसळली; १५ ठार

शिल्पा आणि राज कुंद्राच्या वाढल्या अडचणी पोलिसांनी बजावले…

तब्येत बिघडल्याच्या बहाण्याने हॉटेलवर नेलं नंतर….

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *