अभिनेत्री(actress) शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात लूकआउट सर्क्युलर जारी केला आहे. आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा एकदा फसवणूक प्रकरणी कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण जाणून घेणार आहोत.

खरं तर, हा संपूर्ण खटला व्यावसायिक दीपक कोठारी यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराचा आरोप आहे की २०१५ ते २०२३ दरम्यान शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज यांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून ६० कोटी रुपये घेतले आहेत. हे सर्व पैसे बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीमार्फत तक्रारदाराकडून घेण्यात आले आहेत.
या प्रकरणाची अधिक माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हे लूकआउट सर्क्युलर जारी केले आहे कारण हे जोडपे वारंवार आंतरराष्ट्रीय प्रवास करत असते. त्यांनी सांगितले की, कर्ज आणि गुंतवणूक करारात एका व्यावसायिकाची सुमारे ६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल १४ ऑगस्ट रोजी जुहू पोलिस ठाण्यात अभिनेत्री आणि तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता(actress).
हेही वाचा :
तब्येत बिघडल्याच्या बहाण्याने हॉटेलवर नेलं नंतर….
लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार.. उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली तारीख
घरबसल्या दरमहा मिळतील हजारो रुपये, या योजना जाणून घ्या