मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या जयघोषात शनिवारी लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. अनंत चतुर्दशीला(Anant Chaturdashi) गणराय पुन्हा त्यांच्या घरी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. घरोघरी लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू झाली असून, सार्वजनिक मंडळांसह यंत्रणा सज्ज आहे. बाप्पाचे विसर्जन करताना मन अतिशय निराश होते, पण परंपरेनुसार दरवर्षी बाप्पाला थाटामाटात निरोप देऊन पुढच्या वर्षी परत येण्याची विनंती केली जाते.

धार्मिक भावना दुखावू नयेत आणि सार्वजनिक शांतता राखावी या उद्देशाने, महाराष्ट्रातील पुणे पोलिसांनी एक आदेश जारी केला, ज्यामध्ये गणेश मूर्तीच्या विसर्जनाचे फोटो आणि व्हिडिओ शूट करणे व प्रसारित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. नैसर्गिक जलस्रोतांमध्ये किवा कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित केलेल्या मूर्तीचे दृश्य दाखवणे आणि प्रसारित करणे धार्मिक भावना दुखावू शकते आणि सार्वजनिक शांतता बिघडू शकते, असे आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, गणेश विसर्जनाच्या(Anant Chaturdashi) पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांत पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. मुंबईत 21000 हून अधिक पोलिस तैनात असणार आहेत. अनंत चतुर्दशी म्हणजेच गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मूर्ती विसर्जनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे पोलिस तैनात केले जातील, असे एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले.

पहिल्यांदाच, पोलिस मार्ग व्यवस्थापन आणि इतर वाहतूक संबंधित अद्यतनांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करतील. या तैनातीत 12 अतिरिक्त पोलिस आयुक्त, 40 उपायुक्त, 61 सहाय्यक आयुक्त, 3000 अधिकारी आणि 18000 पोलिसांचा समावेश असेल. याशिवाय, राज्य राखीव पोलिस दलाच्या 14 कंपन्या, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या चार कंपन्या, जलद प्रतिक्रिया पथके आणि बॉम्ब निकामी पथके देखील तैनात केली जातील.

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी महानगरपालिकेने 419 कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. स्वस्तिक फॉरमेशनमध्ये तिथे कृत्रिम तलाव मांडण्यात आले आहे. गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील 216 ठिकाणी 419 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, सहा फूट व त्यापेक्षा मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी गोरेवाडा कृत्रिम तलाव सज्ज असून, हा कृत्रिम तलाव कोराडी कृत्रिम तलावापेक्षा मोठा आहे.

पुण्यात पहिला मानाचा कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतो. लाल-पांढऱ्या पारंपरिक वेशभूषेत कार्यकर्त्यांची फौज, ढोल, लेझिम, झांज पथकांचा गजर आणि ‘ग्रामदैवताला निरोप’ देणाऱ्या भाविकांची गर्दी असणार आहे.

हेही वाचा :

पर्यटकांची बस थेट १००० फूट खोल दरीत कोसळली; १५ ठार

शिल्पा आणि राज कुंद्राच्या वाढल्या अडचणी पोलिसांनी बजावले…

तब्येत बिघडल्याच्या बहाण्याने हॉटेलवर नेलं नंतर….

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *