अलीकडे धोकादायक स्टंट करण्याचे प्रमाणा प्रचंड वाढले आहे. पण या हिरोगिरीच्या नादात अनेकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले आहे. तरीही लोक सुधरण्याचे नाव घेत नाही. सध्या उज्जैनमध्ये एका मिरवणुकीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाला आगीशी खेळण महागात पडले आहे. या स्टंटमुळे गाडीला आग(fire) लागून काही तरुण गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या या भयावह घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तरुणाला त्याचा अतिउत्साह नडला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मिरवणूक सुरु आहे. उज्जैरनमधील बेरवा समाजाची ही मिरवणूक आहे. दरवर्षी बेरवा समाज डोल ग्यारसच्या मुहूर्तावर मिरवणूक काढतो. दरम्यान या मिरवणूकीत एक भयंकर घटना घडली आहे. तुम्ही पाहू शकता की, काही मुले गाड्यांवर उभे आहेत. आणि धोकादायक स्टंट करत आहे. तरुण अतिउत्साहात आहेत आणि तोडांत पेट्रोल भरुन हवेत आगीचा(fire) लोळा फेकण्याचा प्रयत्न करत आहे.

परंतु हा प्रयत्न तरुणांना चांगला नडला आहे. यामुळे अचानक समोर उभ्या असलेल्या तरुणाच्या शर्टला आग लागली आणि बघता बघात आगीने रौद्र रुप धारण तेले आणि गाडीला आग लागली आहे. या आगीत काही तरुण गंभीर जखमी झाल्याचे दिसते. तुम्ही पाहू शकता की, गाडी जळताना आणि त्यातून धूर निघताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आग विझवून आगीत जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. या भयावह घटनेचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्थानिकांची प्रचंड गर्दी देखील आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Raghvendram14 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच असे स्टंट करणे किती महागात पडते हे या व्हिडिओवरुन लक्षात येते. हा व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

हेही वाचा :

प्रतीक्षा संपली! उद्या लाँच होतोय iPhone 17

हवेत खुर्च्या अशा पलटल्या की पाहून संपूर्ण इंटरनेट हादरलं… Video Viral

भाजप खासदाराच्या बहिणीचा सासरी छळ, आंघोळीचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न Video Viral

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *