सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की, हसून पोट दुखून येईल. तर काही व्हिडिओ पाहून हसावे का रडावे हे कळणार नाही. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणासोबत आणि त्याच्यामुळे काही लोकांसोबत असे काही घडले आहे की, यावर नक्की हसावे का रडावे कळणार नाही. तसे पाहता ही एक गंभीर दुर्घटना आहे. तरुणाला मेट्रोमध्ये(metro) स्टंटबाजी करणं भोवलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मेट्रोन(metro) लोकांनी भरलेली दिसत आहे. याच वेळी एक तरुण रिल बनवताना दिसत आहे. तरुण थोडा हेल्दी आहे. तरुण मेट्रोमध्ये छताला उलटे लटकण्याचा स्टंट करत असतो. सुरुवातीला त्याचा स्टंट यशस्वी होतो, पण तरुण उलटा लटकलेला असताना अचानक मेट्रोची छत कोसळते. सध्या हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याचा माहिती मिळालेली नाही, पण लोकांनी या व्हिडिओचा आनंद लुटला आहे. परंतु अनेकांनी या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या लोकांबद्दल काळजी व्यक्त केली आहे.

सध्या सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज साठी प्रसिद्धीसाठी स्टंबाजीचे प्रमाणा वाढत आहे. अनेकजण धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत. यामुळे अनेकांचा बळी गेला आहे, पण लोक सुधारण्याचे नाव घेत नाही. कोणी कधी धावत्या ट्रेनसमोर स्टंट करत आहे, तर कोणी मेट्रोमध्ये स्टंट करत आहे. कोणी बाईकवर धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. विशेष करुन याचे तरुणांमध्ये प्रमाण प्रचंड वाढले आहे. थोड्या लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक जीव धोक्यात घालत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @indianmeenukhan या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. एका नेटकऱ्याने बिचारा मेट्रोचे छत किती मजबूत आहे चेक करत होता असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने ही स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारली पठ्ठ्याने असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने एडिटेड व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

तब्बल 16 भारतीय खेळाडू मैदानात, कर्णधार मात्र पाकिस्तानचा

सरकारची डोकेदुखी वाढली, आरक्षणासाठी आता ‘हा’ समाज मैदानात!

अरे बाप रे! एकीकडे GST कमी झाला असतानाच ‘या’ 5 बाईक्सच्या टॅक्समध्ये होणार वाढ

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *