आशिया कप 2025 ही स्पर्धा मंगळवार 9 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. यात भारतीय संघाचा पहिला ग्रुप स्टेज सामना यूएई विरुद्ध 10 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार असून या सामन्यात तब्बल 16 भारतीय खेळाडू मैदानात उतरण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे भारताचा सामना हा यूएई विरुद्ध जरी होत असला तरी यूएई बोर्डाने आशिया कपसाठी जाहीर केलेल्या संघात तब्बल 5 खेळाडू (Indian players)हे भारतीय आहेत, तर त्यांचा कर्णधार हा पाकिस्तानी आहे. त्यामुळे जर का यूएई संघाच्या प्लेईंग 11 मध्ये त्या 5 भारतीय खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात प्रथमच 16 भारतीय खेळाडू मैदानात उतरतील.

आशिया कपमध्ये 8 संघांचा समावेश :
आशिया कप 2025 मध्ये यंदा 8 संघांचा समावेश असणार आहे. या 8 संघांना दोन गटात विभागण्यात आलं असून ग्रुप एमध्ये भारत, पाकिस्तान, यूएई, ओमन तर ग्रुप बी – बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, हाँगकाँग यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल संघ पुढील फेरीत प्रवेश करतील, आणि अंतिम सामना 28 सप्टेंबर 2025 रोजी होईल. ग्रुप एमध्ये भारत, पाकिस्तान, यूएई, ओमन तर ग्रुप बी – बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, हाँगकाँग यांचा समावेश आहे.
युएई संघात किती भारतीय खेळाडू?
युएई बोर्डाने आशिया कप 2025 साठी त्यांच्या 17 खेळाडूंचा संघ जाहीर केलेला आहे. यापैकी ५ खेळाडू हे भारतीय आहेत तर यूएईचा कर्णधार असलेला मोहम्मद वसीम हा मूळचा पाकिस्तानी खेळाडू(Indian players) आहे. युएई बोर्डाने आशिया कपसाठी जाहीर केलेल्या संघात सिमरनजीत सिंग, हर्षित कौशिक, ध्रुव पराशर, आर्यंश शर्मा, अलिशन शरफु हे भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. ध्रुव पराशर या खेळाडूचा जन्म पुण्यात झाला तर अलिशन शरफुचा जन्म तिरूवअनंतपुरम येथे आहे.
भारत विरुद्ध यूएईचा सामना कुठे पाहाल?
दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बुधवार 10 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध यूएई यांच्यात सामना होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होईल. आशिया कप 2025 च्या सामन्यांचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स चॅनलवर होईल. तर ऑनलाईन युझर्स सोनी ऍप तसेच वेबसाईटवर या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात. भारतातील फ्री डिश वापरणारे प्रेक्षक डीडी स्पोर्ट्सवर सामना मोफत पाहू शकतील. मल्टीनेशनल स्पर्धांमध्ये, डीडी स्पोर्ट्स भारताच्या सामन्यांव्यतिरिक्त महत्त्वाचे सामने मोफत दाखवते.
भारत संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, संजू सैमसन, हर्षित राणा, रिंकू सिंह
यूएई संघ :
मोहम्मद वसीम (कर्णधार), अलीशन शराफू, आर्यंश शर्मा (विकेटकीपर), आसिफ खान, ध्रुव पराशर, ईथन डी’सूजा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मतीउल्लाह खान, मोहम्मद फारूक, मोहम्मद जवदुल्लाह, मोहम्मद जोहेब, राहुल चोपड़ा (विकेटकीपर), रोहिद खान, सिमरनजीत सिंह, सगीर खान
हेही वाचा :
रोहित पवार जी, …अन्यथा राजकीय संन्यास घ्या ; बावनकुळे रोहित पवारांना असं का म्हणाले?
भाजप खासदाराच्या बहिणीचा सासरी छळ, आंघोळीचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न Video Viral
तरुणाने तोंडात पेट्रोल भरलं अन् आगीचा लोळा हवेत सोडला अन्… Video Vir