क्रिकेटच्या मैदानावर ‘’कॅप्टन कूल’ म्हणून जगभर प्रसिद्ध असलेला महेंद्रसिंह धोनी(sports news) आता मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. 7 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ टीझरने त्याच्या करोडो चाहत्यांना आश्चर्यचकित केले. या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंह धोनीला हेलिकॉप्टर शॉटसाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू म्हणून नव्हे तर टास्क फोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे.

अभिनेते आर. माधवन यांनी हा टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘एक मिशन. दोन जांबाज. तयार व्हा, धमाकेदार चेज सुरू होणार आहे!’ असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. व्हिडिओमध्ये धोनी(sports news)कमांडो युनिफॉर्ममध्ये, डोळ्यांवर काळ्या चष्म्यात आणि शस्त्र घेऊन दुश्मनांवर गोळीबार करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत माधवनही टास्क फोर्स ऑफिसरच्या भूमिकेत असून दोघेही एकत्र लढताना दिसत आहेत.
टीझरचा शेवट ‘कमिंग सून’ अशा शब्दांसह होतो. मात्र तो चित्रपट आहे की वेब सिरीज किंवा एखादा उच्च बजेट जाहिरात प्रकल्प याबाबत अजून स्पष्टता मिळालेली नाही. व्हिडिओमध्ये धोनीचा इंट्रो ‘दू कूल हेड’ अशा नावाने दिला आहे. तर आर. माधवनला रोमँटिक ऑफिसर’ म्हणून दाखवले आहे.
व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर आला आहे. एका चाहत्याने लिहिले की, ‘आपले थाला आता हिरो झाले का?’ तर दुसऱ्याने लिहिले ‘मैदानावर धोनी फिनिशर होते, आता पडद्यावर अॅक्शन हिरो!’ अजून एका चाहत्याने उत्साहाने लिहिले की, ‘पहिल्या दिवशी पहिला शो आमचाच!’ असं म्हटलं आहे.
यापूर्वी महेंद्रसिंह धोनीने तमिळ चित्रपट ‘गोठ’मध्ये छोटेखानी कॅमिओ केला होता. परंतु यावेळी त्याचा मुख्य आणि मोठा रोल असण्याची शक्यता आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की जर हा चित्रपट निघाला तर तो बॉक्स ऑफिसवर धमाका ठरेल. क्रिकेटमध्ये शांत राहणाऱ्या धोनीचा आक्रमक स्टाईल यामध्येही दिसत आहे.
हेही वाचा :
तब्बल 16 भारतीय खेळाडू मैदानात, कर्णधार मात्र पाकिस्तानचा
सरकारची डोकेदुखी वाढली, आरक्षणासाठी आता ‘हा’ समाज मैदानात!
अरे बाप रे! एकीकडे GST कमी झाला असतानाच ‘या’ 5 बाईक्सच्या टॅक्समध्ये होणार वाढ