ब्राझीलचा प्रसिद्ध बॉडीबिल्डिंग खेळाडू (sports)वाल्टर डी वर्गास ऐटा (वय 41) याचा मृत्यू रविवारी (7 सप्टेंबर) झाला. त्याची हत्या त्याच्यासोबत राहणाऱ्या 43 वर्षीय गर्लफ्रेंडने केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना सांता कॅटरीना प्रांतातील चापेको येथे घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, ऐटा आणि त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये घरात तीव्र वाद झाला(sports). वाद चिघळल्यावर महिलेने हातातील धारदार शस्त्राने वारंवार हल्ला केला. चेहरा, मान, पाठ आणि पोटावर गंभीर जखमा झाल्याने ऐटा स्वत:चा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात जिन्यावरून खाली कोसळला. मात्र तो तिथेच कोसळला आणि रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलिसांना घरातील रक्ताचे ठसे आणि धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. ऐटाच्या मृतदेहावर खोल जखमा होत्या. महिलेचाही या झटापटीत गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ती वाचली तर तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.

सिव्हिल पोलिसांनी तपासात उघड केले की आरोपी महिलेचा गुन्हेगारी इतिहास आहे. यापूर्वी ती सशस्त्र दरोडा आणि खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरली होती व शिक्षा भोगत होती. अपीलवर सुटून ती ऐटासोबत राहत होती. आता तिच्यावर आणखी एका खुनाचा आरोप होण्याची शक्यता आहे.

वाल्टर डी वर्गास ऐटा हा बॉडीबिल्डिंग जगतात मानाचं नाव होतं. त्याने सहा राज्यस्तरीय किताब जिंकले होते, तसेच 2024 च्या WFF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उपविजेता ठरला होता. तो चापेको येथील एका जिममध्ये पर्सनल ट्रेनर म्हणून काम करत होता. त्याच्या अचानक मृत्यूमुळे जिम बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या घटनेने ब्राझीलसह आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग विश्व हादरले आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून, खेळाडूंच्या खासगी आयुष्यातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

हेही वाचा :

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदी स्वस्त झाले

चार मुलं जन्माला घाला अन् करमाफी मिळवा ; सरकारचं अजब फर्मान

‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालचा अपघाती मृत्यू? सोशल मीडियावर चाहत्यांकडून श्रद्धांजली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *