गेल्या काही दिवसांपासून महागाईची भीती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ–उतार यामुळे मौल्यवान धातूंच्या किंमतीत सातत्याने हालचाल दिसत होती. मागील आठवड्यात सोन्या–चांदीने जोरदार उसळी घेत ग्राहकांना दणका दिला होता. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला परिस्थिती बदलली असून सोन्या(Gold)–चांदीच्या भावात घसरण दिसून आली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

मागील आठवड्यात सोन्याने तब्बल २१०० रुपयांहून अधिक उसळी घेतली होती. पण सोमवारी सोन्याचा भाव खाली आला. गुडरिटर्न्सनुसार, आज सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा(Gold) भाव १,०८,५२० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ९९,४९० रुपये इतका झाला आहे. सोमवारी १०० रुपयांनी दर कमी झाला होता. त्यामुळे सोनं खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी ठरली आहे.

चांदीनेही मागील आठवड्यात सुरुवातीला चार दिवस चांगली तेजी दाखवली होती. मात्र ४ सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेच्या सुधारणा जाहीर झाल्यानंतर चांदीचा उत्साह मावळला. ५ सप्टेंबर रोजी चांदी एक हजार रुपयांनी घसरली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला पुन्हा दर खाली आले असून आज सकाळी एक किलो चांदीचा भाव १,२६,००० रुपयांवर आला आहे.

१४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव :
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) आज सकाळच्या सत्रात सोन्याचा दर असा होता – २४ कॅरेट सोने १,०८,०४० रुपये, २३ कॅरेट १,०७,६०० रुपये, २२ कॅरेट ९८,९६० रुपये, १८ कॅरेट ८१,०३० रुपये आणि १४ कॅरेट सोने ६३,२०० रुपये प्रति १० ग्रॅम. तर एक किलो चांदीचा दर १,२३,३६८ रुपये होता. वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कर किंवा शुल्क लागू नसल्याने दरांमध्ये थोडाफार फरक दिसतो.

४ सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत नवीन कर स्लॅब ठरवण्यात आले. आता ५% आणि १८% हे दोनच स्लॅब असतील. मात्र सोने आणि चांदीवर जीएसटीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सध्या या मौल्यवान धातूंवर ३% जीएसटी आणि मेकिंग चार्जवर ५% जीएसटी कायम आहे. त्यामुळे सरकारने ग्राहकांना अतिरिक्त भार टाकलेला नाही.

हेही वाचा :

संसदेत आज उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक! राधाकृष्णन विरुद्ध रेड्डी, कोण मारणार बाजी?

मेट्रोत छताला लटकून स्टंट करायला गेला तरुण अन् घडलं भलतंच; भयावह Video Viral

महेंद्रसिंह धोनी मैदानावरून थेट पडद्यावर, टास्क फोर्स ऑफिसरच्या भूमिकेत!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *