साऊथ आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवणाऱ्या काजल अग्रवालचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आणि सर्वांच्या पायाखालची जमीन हादरली. ‘सिंघम’ सिनेमातून काजल अग्रवालनं अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर केली. तेव्हापासून काजल अग्रवाल प्रसिद्धीझोतात आली. त्याव्यतिरिक्त काजलनं अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्येही आपलं अभिनय कौशल्य दाखवलंय. अशातच अशी हरहुन्नरी अभिनेत्रीच्या निधनाच्या वृत्तानं सारे चाहते हळहळले. पण काही वेळातच खुद्द अभिनेत्रीनं(actress) सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि मृत्यूच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. तसेच, ती पूर्णपणे सुरक्षित असल्याचं चाहत्यांना सांगितलं.

खरं तर, सोमवारी (9 सप्टेंबर) रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक बातमी आली आणि ती क्षणाधार्त व्हायरल झाली. ‘सिंघम’ फेम अभिनेत्री(actress) काजल अग्रवालचा अपघाती मृत्यू झाल्याचा दावा या बातमीतून करण्यात आला आहे. काजल अग्रवालचा एका गंभीर अपघातात जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला, अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. काही वेळातच सोशल मीडियावर #KajalAggarwal हा हॅशटॅग ट्रेंड व्हायला सुरुवात झाली. कुणाला काहीच कळेना, तेवढ्यात काजल अग्रवालनं लगेचच या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट केली.
काजल अग्रवालनं स्वतःच्या मृत्यूच्या चर्चांचं खंडन केलं. तिनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीज आणि एक्स (ट्विटर) अकाउंटवर एक पोस्ट केली. काजल अग्रवालनं पोस्टमध्ये लिहिलं की, “मी काही बातम्या पाहिल्यात ज्यात दावा केला आहे की, मी अपघातात जखमी झाली आणि आता या जगात नाही… खरं सांगायचं तर, हे खूपच विचित्र आहे, कारण ते पूर्णपणे खोटं आहे. देवाच्या कृपेनं, मी तुम्हाला सर्वांना खात्री देऊ इच्छिते की, मी पूर्णपणे ठीक आहे, सुरक्षित आहे आणि खूप चांगली आहे… मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते की, अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका किंवा पुढे पाठवू नका. चला आपण आपली ऊर्जा सकारात्मकता आणि सत्यावर केंद्रित करूयात…”
अलिकडेच, काजल तिचा पती गौतम किचलूसोबत सुट्टी घालवण्यासाठी मालदीवला गेली होती. तिनं तिच्या प्रवासाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आणि लिहिलंय की, “मालदीव: माझं प्रेम जे पुन्हा पुन्हा येते, मला दर महिन्याला इथे यायला नेहमीच आवडतं. इथलं असीम सौंदर्य, चमक आणि सूर्यास्त, जे निसर्गाचं सर्वात सुंदर धावपट्टी वाटतात, ते प्रत्येक वेळी माझे मन जिंकतात…”

दरम्यान, काजल अग्रवालनं अलिकडेच विष्णू मांचूच्या ‘कन्नप्पा’ चित्रपटात काम केलंय. याशिवाय ती सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासोबत ‘सिकंदर’ या बॉलिवूड चित्रपटात दिसली. तिचा पुढचा मोठा प्रोजेक्ट कमल हासनसोबत ‘इंडियन 3’ आहे. यासोबतच ती नितेश तिवारीच्या दोन भागांच्या ‘रामायण’ या महाकाव्य चित्रपटाचा भाग आहे. मिडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटात काजल यशसोबत ‘मंदोद्री’ या रावणाची पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि साई पल्लवी देखील मुख्य भूमिकेत आहेत.
हेही वाचा :
महेंद्रसिंह धोनी मैदानावरून थेट पडद्यावर, टास्क फोर्स ऑफिसरच्या भूमिकेत!
ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदी स्वस्त झाले
चार मुलं जन्माला घाला अन् करमाफी मिळवा ; सरकारचं अजब फर्मान