सध्या सोशल मीडियावर नेपाळमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.(protesters) या व्हिडीओमध्ये नेपाळचे अर्थमंत्री जीव मूठीत घेऊन आदोलकांपासून पळताना दिसत आहेत. अर्थमंत्र्यांचा हादरुन टाकणारा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये राजकीय भूकंप आला आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजिनामा दिला आहे.

त्याआधी तीन मंत्र्यांनी राजिनामा दिला होता. नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घालणे ओली सरकारलं चांगलच भोवलं आहे. लाखो तरुण रस्त्यावर उतरुन आंदोलन करताना दिसत आहे. या तरुणांनी काही मंत्र्यांच्या घरावर गोळीबार केला आहे तर काही मंत्र्यांची घरे पेटवली आहेत. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नेपाळच्या अर्थमंत्र्यांना आंदोलक तरुणांनी मारहाण केल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नेपाळचे अर्थमंत्री विष्णू पौडेल रस्त्यावर दिसत आहेत. अनेक आंदोलक हे विष्णू पौडेल यांच्या अंगावर धावून गेले आहेत. काहींनी त्यांचे कपडे ओढले तर काहींनी लाथा बुंग्या मारल्या आहेत. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की विष्णू पौडेल हे (protesters) जीव मूठीत घेऊन आंदोलकांपासून पळत आहेत. पुढे ते आंदोलकांच्या हाती लागले ही तेथून पळ काढण्यात यशस्वी झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तरुणांच्या आंदोलनामुळे नेपाळमधील सरकार चांगलेच हादरले आहे. पहिले गृहमंत्री रमेश लेखक, कृषी मंत्री रामनाथ अधिकारी, आरोग्य मंत्री प्रदीप पौडेल आणि जल मंत्री प्रदीप यादव यांनी मंत्री पदाचा राजिनामा दिला. परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी देखील राजिनामा दिला. यावरून स्पष्ट होते की आंदोलकांचा दबाव आता सरकारला सांभाळणे शक्य राहिले नाही.

विष्णू पौडेल हे नेपाळचे मोठे नेते आहेत. ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ चे उपाध्यक्ष आहेत. पौडेल यांनी अलीकडेच तृतीय दहल मंत्रिमंडळात उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. यापूर्वीही त्यांनी अनेकदा महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी (protesters) सांभाळली आहे. 2021 मध्ये ते उपपंतप्रधान होते आणि त्यांनी गृहमंत्रालय, उद्योग मंत्रालय, जल मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळली आहे. अर्थमंत्रालयाची जबाबदारी त्यांनी दोनदा सांभाळली आहे. जल मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी 1994-99, 2008-09 आणि 2021 मध्येही पार पाडली होती.

हेही वाचा :

‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालचा अपघाती मृत्यू? सोशल मीडियावर चाहत्यांकडून श्रद्धांजली

चॅम्पियन खेळाडूची प्रेयसीने केली निर्घृण हत्या, क्रीडा जगताला धक्का

कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर अपघात; भरधाव कारची रिक्षाला जोरदार धडक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *