देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना दोन दिवस मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. बँकेने(Bank) दिलेल्या माहितीनुसार, 12 आणि 13 सप्टेंबरच्या मध्यरात्री बँकेची UPI सेवा तात्पुरती बंद राहणार आहे. या काळात Google Pay, PhonePe, Paytm सारख्या ॲप्सवरून होणारे व्यवहार थांबतील. बँकेनं सिस्टिम अपडेटसाठी हा निर्णय घेतला असून, ग्राहकांनी आवश्यक ते व्यवहार आधीच पूर्ण करावेत, असा सल्ला दिला आहे.

कोणत्या वेळेत सेवा बंद राहणार? :
एचडीएफसी बँकेच्या(Bank) माहितीनुसार, हे देखभाल कार्य 12 सप्टेंबर रात्री 12 वाजल्यापासून 13 सप्टेंबर पहाटे 1.30 वाजेपर्यंत चालेल. म्हणजे साधारण दीड तासांसाठी UPI सेवा ठप्प राहणार आहे.
जरी हा वेळ बहुतेक लोक झोपलेले असण्याचा असला तरी, रात्री प्रवास करणारे प्रवासी, हॉस्पिटलमधील आपत्कालीन परिस्थिती किंवा व्यापारी वर्गाला पेमेंट घ्यावे लागल्यास अडचण होऊ शकते. त्यामुळे बँकेने आधीच पर्यायी तयारी करण्याचा सल्ला दिला आहे.
कोणत्या सेवांवर परिणाम होईल? :
– या काळात HDFC च्या बचत व चालू खात्यांशी जोडलेले सर्व UPI व्यवहार थांबतील.
– Google Pay, PhonePe, Paytm सारख्या थर्ड पार्टी ॲप्सवर पेमेंट अडकतील.
– RuPay क्रेडिट कार्डवर आधारित UPI व्यवहार होणार नाहीत.
– व्यापाऱ्यांसाठी जोडलेल्या सर्व UPI सेवा बंद राहतील.
– बँकेने ग्राहकांना आपल्या डिजिटल वॉलेट PayZapp वापरण्याचा पर्याय दिला आहे.
बँकेनं ग्राहकांना दिलेली सूचना :
एचडीएफसी बँकेने ईमेल व मेसेजद्वारे ग्राहकांना याबाबत सूचना केली आहे. बँकेचं म्हणणं आहे की, UPI पेमेंट्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. लाखो ग्राहक रोज या सेवांचा वापर करतात. त्यामुळे सिस्टिमवर ताण येतो. सुरक्षितता आणि वेग टिकवण्यासाठी अशा प्रकारचे नियमित अपग्रेड आवश्यक असतात.
तज्ज्ञांच्या मते, हा दीड तासांचा ब्रेक भविष्यातील मोठ्या अडचणी टाळण्यासाठी महत्त्वाचा आहे. तसेच बँकेने स्पष्ट केलं आहे की, 12-13 सप्टेंबरच्या रात्री UPI सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी गरजेचे व्यवहार आधीच पूर्ण करून घ्यावेत. रात्रीची पेमेंटची कामं पुढे ढकलू नयेत. आपत्कालीन परिस्थितीत थोडे रोख पैसे हाताशी ठेवावेत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
हेही वाचा :
एका कुटुंबाची शोकांतिका! ना खंत, ना खेद कुणाला..!
सरकारचं टेन्शन वाढलं! ओबीसींचा महामोर्चा ‘या’ तारखेला मुंबईत धडकणार
बायको माहेरी गेली म्हणून तिला आणायला गेला; मात्र घडलं भयंकर…