दक्षिण आफ्रिकेसाठी टी 20i क्रिकेटमध्ये 38 विकेट्स(cricket) घेणाऱ्या केशव महाराज याला दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिकेनंतर 3 सामन्यांची टी 20I सीरिज खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेने बुधवारी 10 सप्टेंबरला इंग्लंडवर डीएलएसनुसार 14 धावांनी मात करत विजयी सलामी दिली. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.(cricket) त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. उभयसंघातील दुसरा सामना हा मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला आज 12 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका लागला आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार बॉलर दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर झाला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाकडून सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा स्टार स्पिनर हनुमानभक्त केशव महाराज याला दुखापतीमुळे इंग्लंड विरूद्धच्या उर्वरित मालिकेतून बाहेर व्हावं लागलंय. केशवला डाव्या मांडीला त्रास जाणवत असल्याने त्याला मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. केशवच्या जागी बदली खेळाडूच्या नावाची घोषणाही क्रिकेट बोर्डाकडून करण्यात आली आहे. केशवच्या जागी ब्योर्न फोर्टुइन याला संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ब्योर्न फोर्टुइन याचा दुसर्‍या टी 20i सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

ब्योर्न फोर्टुइन याची कारकीर्द
ब्योर्न फोर्टुइन याने दक्षिण आफ्रिकेचं 13 एकदिवसीय आणि 25 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. ब्योर्नने 18 सप्टेंबर 2019 रोजी टीम इंडिया विरुद्ध टी 20i पदार्पण केलं होतं. तेव्हापासून ब्योर्नने 25 सामन्यांमध्ये एकूण 20 विकेट्स मिळवल्या आहेत. तर ब्योर्नने 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये 16 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

तसेच केशवच्या दुखापतीमुळे ब्योर्नचं जवळपास वर्षभरानंतर कमबॅक झालं आहे. ब्योर्नने आयर्लंड विरुद्ध 29 सप्टेंबर 2024 रोजी अखेरचा टी 20i सामना खेळला होता. त्यामुळे आता ब्योर्न मिळालेल्या संधीचा कसा फायदा घेतो, याकडे टीम मॅनजमेंटचं लक्ष असणार आहे.

केशव महाराज टी 20i मालिकेतून आऊट

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्करम , रायन रिकेल्टन , लुआन-ड्रे प्रिटोरियस, डेवाल्ड ब्रेव्हिस, ट्रिस्टन स्टब्स, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅन्सेन, कगिसो रबाडा, ब्योर्न फोर्टुइन, क्वेना मफाका आणि लिझाड विल्यम्स.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : फिलिप साल्ट, जोस बटलर , जेकब बेथेल, हॅरी ब्रूक , टॉम बॅंटन, विल जॅक्स, सॅम करन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि ल्यूक वूड.

हेही वाचा :

नीरज चोप्रा वचपा काढण्यासाठी सज्ज

 हिल स्टेशन्सला द्या भेट, ठिकाणांच्या प्रेमात पडाल

सकाळी नाश्त्यात झटपट बनवा ‘Veggie Pancakes’, सोपी आहे रेसिपी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *