आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान हे दोन संघ 14 सप्टेंबरला आमनेसामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित राहिली नाही.पुढच्या आठवड्यात टोकियो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एथलेटिक्समध्ये नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांच्यात सामना होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. कोणत्याही खेळात समोरासमोर आले की त्याची धार आणखी वाढते. त्यामुळे स्पर्धा फक्त क्रिकेटपुरता मर्यादीत राहिलेली नाही. टोकियो ऑलिंपिक विजेता नीरज चोप्रा आणि पॅरिस ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीम भिडताना दिसणार आहेत. भारताकडून विश्वविजेता नीरज चोप्रा 13 ते 21 सप्टेंबर दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत 19 सदस्यीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
पॅरिस ऑलिंपिकमध्ये हे दोन्ही दिग्गज खेळाडू भिडले होते. त्यानंतर हे दिग्गज मैदानावर स्पर्धा करताना दिसण्याची पहिलीच वेळ असेल. पॅरिस ऑलिंपिकमध्ये, नदीमने 92.97 मीटरच्या विक्रमी फेकसह सुवर्णपदक जिंकले होते. तसेच नीरज चोप्राला मागे टाकले होते.
दरम्यान, नीरजने वाईल्ड कार्डद्वारे थेट गतविजेता म्हणून या स्पर्धेत प्रवेश केला आहे. पात्रता कालावधीत त्याने अनेक वेळा 85.80 मीटरपेक्षा जास्त फेकून आपली तंदुरुस्ती आणि लय सिद्ध केली आहे. तर नदीमने या वर्षी मे महिन्यात दक्षिण कोरियामध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 86.40 मीटर लांब भाला फेकून सुवर्णपदक जिंकले आणि पात्रता मिळवली.
दुसरीकडे, स्पर्धा जरी दोघांत असली तरी जर्मनीच्या ज्युलियन वेबरने या हंगामात तीनदा 90 मीटरपेक्षा जास्त फेक केली आहे. त्यामुळे या स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला आहे. नीरजने या वर्षी दोहा डायमंड लीगमध्ये त्याच्या कारकिर्दीतील 90.23 लांब भाला फेकला होता. या स्पर्धेतही त्याच्याकडून अशीच अपेक्षा आहे.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक पात्रता फेरी 17 सप्टेंबर रोजी आणि अंतिम फेरी दुसऱ्या दिवशी होणार आहे. टोकियो येथे होणाऱ्या या स्पर्धेत भारताचे सचिन यादव, यशवीर सिंग आणि रोहित यादव हे तीन खेळाडूही सहभागी होत आहेत. त्यामुळे भालाफेक स्पर्धेत भारताची ताकद वाढत असल्याचं दिसत आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! ‘या’ नेत्यावर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी
बाप रे! दिल्ली मेट्रोत दोन पुरुषांमध्ये तुफान राडा; एकाने चप्पल काढली अन्.., VIDEO VIRAL
‘माझ्यासोबत शरीर संबंध ठेव मगच तुला मूल…’ निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून सुनेचा छळ