पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीसाठी शास्त्राने प्राणघातक हल्ला(attacked) केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमी झालेल्या तरुणाचे नाव दिप्तिमान देवव्रत दत्ता (वय 33) असे आहे. तर आरोपीचे नाव शिवलिंग म्हात्रे (वय 25) असे आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत. या परिसरात अश्या अनेक घटना घडताना दिसत आहे.

शिवलिंग म्हात्रेच्या मैत्रिणीने त्याच्याशी मैत्री तोडून दिप्तिमान देवव्रत दत्ता याच्यासोबत मैत्री केल्याने शिवलिंग चिडला आणि त्याने हा हल्ला(attacked) केला. दिप्तिमान देवव्रत दत्ता मैत्रीणीला घेण्यासाठी थांबलेला असताना शिवलिंगने हा हल्ला केला. शिवलिंगला या हल्ल्यात मदत करणाऱ्या सिद्धार्थ गादिया आणि बालाजी मुंडे यांना अटक केली. शिवलिंग म्हात्रे हा फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. ही घटना पुण्यात येरवडा रामवाडी एअरपोर्ट रोड येथे घडली आहे. तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर येरवडा खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहे. या परिसरात अश्या घटना अनेकवेळा घडतांना पाहायला मिळत आहे.

दरम्यान, पर्वती पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल बाळगून फिरणार्‍या गुन्हेगाराला पर्वती पोलिसांनी अटक केली आहे.

त्याच्याकडून २ गावठी बनावटीचे पिस्टल, ४ मॅगझिन व २ जिवंत काडतुसे असे ७१ हजार ४०० रुपयांची शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. ओंमकार दीपक जाधव (वय २२, रा. साई सिद्धी चौक, आंबेगाव पठार) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. ओंमकार जाधव याच्याविरुद्ध २०१६ मध्ये वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. ओंमकार मध्यप्रदेशात गेलेला असताना ही पिस्टल विकत घेतली असून, स्वत:च्या संरक्षणासाठी ही पिस्टल बाळगत असल्याचे ओंमकार जाधव याचे म्हणणे आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक किरण पवार यांनी दिली.

पर्वती पोलीस ठाण्याचे तपास पथक परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमदार महेश मंडलिक व सद्दाम शेख यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी ओंमकार जाधव याला पकडले. त्याच्याकडून २ पिस्टल, २ जिवंत काडतुसे व ४ मॅगझिन जप्त केले आहेत. पर्वती पोलीस ठाण्यात ओंमकारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

सचिन तेंडुलकरचं विमान वादळात अडकलं, Video Viral

7040mAh बॅटरीसह लाँच झाला Motorola चा नवा टॅब्लेट

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना गुडन्यूज!





By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *