भारतीय क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी मैदानावरील खेळीमुळे नव्हे तर आफ्रिकेतील त्याच्या अविस्मरणीय प्रवासामुळे. सचिनने सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ(Video) शेअर करत जंगलात वादळाच्या वेळी घडलेला थरारक अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला.

अचानक वादळ आलं
सचिन आपल्या मसाई माराच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी विमानातून प्रवास करत असताना अचानक वादळ आलं. व्हिडीओमध्ये(Video) सचिन सांगताना दिसतो की, “आम्ही विमानात होतो आणि समोरून वादळ येताना पाहत होतो. नेमकं जिथे लँड करायचं होतं, तिथेच वादळ आलं होतं. आम्ही धावपट्टीपासून साधारण दोन मैलांवर होतो, पण खराब हवामानामुळे तिथे उतरणं शक्य नव्हतं.”
त्यानंतर पायलटसमोर दुसरा पर्याय नव्हता. त्याला दुसऱ्या एअरस्ट्रीपवर उतरण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण इथेही अडचणी होत्या. नवीन धावपट्टीवर वाइल्डबीस्टचे कळप फिरत होते. सचिन सांगतो, “प्रथम आम्ही दोनदा खाली उतरलो, त्यांना घाबरवण्यासाठी. शेवटी धावपट्टी मोकळी झाली आणि आम्ही सुरक्षितपणे उतरलो.”
वादळाचा अनुभव यावरच थांबला नाही…
वादळाचा अनुभव यावरच थांबला नाही. सचिन पुढे सांगतो, “पावसाचा जोर वाढला होता. मी मजेत म्हणालो की आता काही वेळ इथेच थांबावं लागेल. आम्ही जंगलातच आहोत. स्थानिक चीफ आम्हाला घेण्यासाठी येत आहेत. आणि जर ते आले नाहीत, तर मग आम्हालाच इथे रात्र काढावी लागेल.”
नेटिझन्सच्या प्रतिक्रिया
त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहत्यांनी सचिनच्या या अनुभवाला “खऱ्या आयुष्यातला थ्रिलर” असं म्हणत प्रतिक्रिया दिल्या आहेत. क्रिकेटच्या बाहेरही तेंडुलकर आपल्या किस्स्यांनी चाहत्यांना रोमांचित करत असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
हेही वाचा :
हा परतीचा पाऊस की मुक्काम ठोकलेला? राज्यात पुन:श्च मुसळधार
जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे तिहेरी यश
तिकडे भारत पाक क्रिकेट सामना इकडे राजकीय मैदान तापलं