राज्यातील पोलीस भरतीची(recruitment) तयारी करणाऱ्या तरूणांसाठी राज्य सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. कारण आता ज्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. त्यामुळे तरूणांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र पोलीस दलामध्ये विविध पदांसाठी असंख्य उमेदवारांची भरती(recruitment) केली जाणार आहे. मंत्रिमंडळाने या भारतीला मान्याता दिली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये 2022 ते 2025 पर्यंतच्या उमेदवारांच्या पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एकदा संधी दिली जाणार आहे. यासाठी या वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे. याबाबतचा आदेश शासनाने जारी केला आहे.
या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलं आहे की, महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई तसेच कारागृहातील शिपाई संवर्गातील 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये रिक्त झालेल्या आणि 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये रिक्त होणाऱ्या एकूण 15,631 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये 2022 ते 2025 पर्यंतच्या उमेदवारांच्या पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे.
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
पोलीस शिपाई – 10 हजार 908
पोलीस शिपाई चालक – 234
बॅण्डस् मॅन – 25
सशस्त्री पोलीस शिपाई – 2,393
कारागृह शिपाई – 554
हेही वाचा :
तिकडे भारत पाक क्रिकेट सामना इकडे राजकीय मैदान तापलं
सचिन तेंडुलकरचं विमान वादळात अडकलं, Video Viral
7040mAh बॅटरीसह लाँच झाला Motorola चा नवा टॅब्लेट