नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नगरधन येथे एक भीषण अपघात झाला आहे. यात एका तरुणाचा(Young) होरपळून मृत्यू झाला आहे. नगरधनचा आठवडी बाजारात भाजी विक्रेत्याच्या दुकानासमोर उभा असताना एका तरुणाचा चुकून गरम तेलाच्या कढईत पडल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी झालेल्या साप्तहिक बाजारात घडली. प्रशांत कुंवरलाल मसुरके (२५) असे तरुणाचे नाव आहे. तो नगरधन परिसरातील रहिवासी होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामटेक तालुक्यातील नगरधन येथे दर शनिवारी आठवडी बाजार भरतो. याच बाजारात विक्की जनबंधु नावाचा व्यापाऱ्याने(Young) नाश्त्याचे दुकान लावले होते. दरम्यान भजी विक्रीसाठी त्याने कढईत गरम तेल तापवत ठेवले होते. त्याच वेळी प्रशांत मसुरके हा तरुण दारूच्या नशेत असल्याने त्याचे तेथे तोल गेला आणि तो थेट गरम तेलाच्या कढईत जाऊन पडला. यात त्याला गंभीर दुखापत झाली.
स्थानिकांनी आणि दुकानदारांनी तातडीने प्रशांतला बाहेर काढून उपचारासाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर भाजल्यामुळे त्याला नागपूरच्या शासकीय वैधकीय महाविद्यालयात (मेडिकल) हलविण्यात आले. त्यांनतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करायला सुरूवात केली, मात्र रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
नागपूर शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे. यात कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एक वृद्ध शेतकरी दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेत पतीचा मृत्यू झाला आहे तर पत्नी मृत्यूशी झुंज देत आहे. नामदेव बरडे (वय 70 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तर लता बरडे हे मृत्यूशी झुंज देत असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टोकाचे पाऊल उचलणाऱ्या बरडे दाम्पत्याची ब्रह्माणी शिवारात दोन एकर शेत आहे. सकाळी शेतातून फेरफटका मारून आल्यानंतर काल (14 सप्टेंबर) दुपारी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. त्यांच्यावर सरकारी बँक आणि पथ संस्थेचे कर्ज झाले होते. त्यामुळे बरडे दाम्पत्य तणावात असल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचल्याची चर्चा आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
नवरा-बायकोला कधीच सांगू नका ‘या’ गोष्टी, घटस्फोट झालाच म्हणून समजा
भर वर्गात दोन शिक्षकांमध्ये जबरदस्त हाणामारी; एकमेकांची कॉलर धरली अन्…, Video Viral
आरक्षणामुळे मराठा-ओबीसीमध्ये लग्न होणार का? लक्ष्मण हाके अन् मनोज जरांगे पाटलांमध्ये जुंपली!