सातारा जिल्ह्यातील तेटली गावात एक विचित्र अपघात(accident) झाला आहे. यात पंक्चर झालेलं कारचं चाक बदलताना अचानक जॅक निसटला आणि कार थेट छातीवर आदळून तरुणाचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात 25 वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. प्रणय शंकर भोसले असे 25 वर्षीय मयत तरुणाचं नाव असून या घटनेने तेटली गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रणय भोसले सातारा जिल्ह्यातील जावळीच्या तेटली गावातील रहिवासी असून ते हॉटेल व्यवसाईक होते. अशातच प्रणय बाहेर जाण्यास निघाले असता त्यांना आपल्या गाडीचं चाक पंक्चर झाल्याचं लक्षात आलं. त्यावेळी त्यांची गाडी त्यांच्या हॉटेलबाहेरच पार्क होती.

यावेळी त्यांनी मेकॅनिकला न बोलवता स्वतःच गाडीचं पंक्चर झालेलं चाक बदलण्याचा निर्णय घेतला(accident). त्यासाठी गाडी वर उचलण्याची ते गाडीखाली शिरले आणि जॅक पुन्हा वर चढवू लागले. मात्र त्याच वेळी अचानक जॅक मूळ जागेवरून सटकून बाजूला पडला आणि गाडी थेट त्याच्या छातीवर पडली. गाडीचा संपूर्ण भार प्रणयच्या छातीवर आल्याने त्यांनी मदतीसाठी मोठ्यांना आवाज दिला. त्याच वेळी प्रणय यांच्या किंकाळ्या ऐकून त्यांच्या पत्नीने हॉटेलमधून बाहेर धावत आली. सोबत त्यांचे वडीलही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, या दोघांनी गाडी वर उचलण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी मदत करत प्रणयला बाहेर काढण्यात आलं आणि उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हि बातमी कुटुंबियांना समजताच भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तेटली गावात शोककळा पसरली आहे.

कोल्हापूर शहरातील फुलेवाडीमध्ये मध्यरात्री गुंडांनी घरात घुसून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून केलाय. महेश राजेंद्र राख असं खून झालेल्या 27 वर्षीय तरुणाचे नाव आहे. आठ ते दहा जणांनी केलेल्या हल्ल्यात महेश राख मृत्यू(accident) झाला असून त्याचा मित्र विश्वजीत भाले हा गंभीर जखमी झालाय.

हल्लेखोर आणि विश्वजीत भाले यांच्यात किरकोळ कारणावरून रात्री वाद झाला होता. या वादातून रात्री उशिरा हल्लेखोर विश्वजीत भाले याच्या घरी दाखल झाले. ही घटना कळताच रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राख त्या ठिकाणी पोहोचला, त्यावेळी हल्लेखोरांनी महेश राख आणि त्याचा मित्र विश्वजीत भाले यांच्यावर एडका तलवार अशा धारदार शस्त्राने हल्ला चढविला.

हेही वाचा :

‘मी विवस्त्र होऊन मैदानात…’, क्रिकेटर बापाचं विधान ऐकताच

मोदीजी अ‍ॅक्शन मोडमध्ये! ट्रम्पच्या 50% टॅरिफवर करणार पुढचा हल्ला

ChatGPT सारख्या चॅटबोट्समुळे पुन्हा येऊ शकते कोरोनासारखी महामारी!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *