युद्धाच्या रणभूमीत पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात देखील भारतानं पाकिस्तानला चारीमुंड्या चित केलंय. आशिष चषकात भारतानं पाकिस्तानला मात दिली असली तरी या सामन्यावरून सुरू झालेलं राजकारण(politics) अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. भारत-पाक सामन्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी एक गंभीर आरोप केलाय. तसंच मोदी, शाहांवर देखील त्यांनी सडकून टीका केलीय.

दरम्यान राऊतांच्या टीकेनंतर भाजपनं देखील त्यांच्यावर पलटवार केला आहे. पाकिस्तानविरोधात सामना खेळण्याची भारतीय संघाची इच्छा नव्हती असा दावा गावस्करांच्या वक्तव्याचा दाखल देत राऊत यांनी केलाय. सरकारनं दबाव टाकल्यामुळे संघ पाकिस्ताविरोधात खेळण्यास तयार झाल्याचा आरोपही राऊतांनी केला. दरम्यान राऊत हे अतार्किक बोलतात असं म्हणत आशिष शेलारांनी राऊतांचा समाचार घेतला.
काल झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला एकतर्फी मात दिली. सूर्यकुमार यादवनं षटकार ठोकत सामना संपवला. दरम्यान यानंतर सूर्यकुमार आणि शिवम दुबेनं थेट ड्रेसिंग रूमचा रस्ता धरला.. पाकिस्तान संघासोबत टॉसच्या वेळी आणि सामना संपल्यानंतर भारतीय संघान हस्तांदोलन करणं टाळलं. भारतीय संघाच्या या कृतीचं भाजपनं कौतुक केलंय.
देशभक्तीवरून दोन्ही शिवसेनेमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. भारत-पाक सामन्याला ठाकरेंनी विरोध केल्यानंतर शिंदेंनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान शिंदेंच्या या टीकेला संजय राऊतांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. भारत-पाकिस्तान सामन्यावरून चांगलंच राजकारण(politics) पेटलंय. या सामन्याला क्रिकेट जगातूनही विरोध झाल्याचं पाहायला मिळालं..
दरम्यान रविवारी भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यानंतर सुपर फोरमध्ये देखील हे दोन्ही पुन्हा संघ आमनेसामने येण्याची शक्यता आहे.. त्यामुळे भारत-पाक सामन्यावरून सुरू झालेलं राजकारण अजून तापण्याची शक्यता आहे..
हेही वाचा :
महाराष्ट्रात सरकारी नोकरीचा पॅटर्न बदलणार? ‘हा’ नवा पॅटर्न लागू होण्याची शक्यता
“लग्न करीन” म्हणून मैत्रिणीला लॉजवर नेलं, शरीर संबंधाची मागणी केली, नकार देताच…
‘या’ तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस; हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांचं रेस्क्यू