भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पत्नी नताशा स्टॅन्कोविकपासून विभक्त झाल्यानंतर हार्दिकचे नाव अनेक अभिनेत्री(actress) व मॉडेल्ससोबत जोडले गेले होते. यापूर्वी त्याचे नाव ब्रिटिश गायिका जास्मिन वालियासोबत चर्चेत आले होते. मात्र, आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे की हार्दिक अभिनेत्री माहिका शर्माला डेट करत आहे.

सेल्फी आणि सोशल मीडिया हिंट्समुळे चर्चा वाढली :
अफेअरच्या चर्चेला सुरुवात झाली ती रेडिटवरील एका सेल्फीमुळे. माहिका शर्माने पोस्ट केलेल्या सेल्फीमध्ये मागे दिसणारी व्यक्ती(actress) हार्दिक असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर अनेकांनी तिच्या पोस्ट्समध्ये हार्दिकच्या जर्सी नंबर 33 ची झलक पाहिल्याचा दावा केला.
फक्त एवढंच नाही, तर हार्दिक आणि माहिका इंस्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करतात, हे लक्षात आल्यावर या चर्चांना आणखी हवा मिळाली. काही युजर्सनी तर दोघेही वेगवेगळ्या फोटोंमध्ये एकाच बाथरोबमध्ये दिसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यातच माहिकाच्या दुबई प्रवासाची सोशल मीडिया स्टोरी व्हायरल झाली, जिथे हार्दिक टीम इंडियासोबत आशिया कपसाठी आहे. यामुळे सोशल मीडियावर अफवांना अधिक बळ मिळाले.
चाहत्यांच्या रिअॅक्शन्स :
एका युजरनं लिहिलं – “मी तिला फॉलो करतो, ती नेहमी क्रिकेटशी संबंधित अपडेट्स शेअर करते. हार्दिकच्या अनेक पोस्ट्सलाही तिनं लाईक केलंय. पण याचा अर्थ असा नाही की ते रिलेशनशिपमध्ये आहेत.” तर दुसऱ्या युजरनं दावा केला – “मी त्यांना एकत्र पाहिलंय, त्यामुळे अफवा खऱ्या असू शकतात.”
म्हणजेच, सोशल मीडियावर अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. काहींना वाटतं की ही फक्त ओळख असावी, तर काहींना खात्री आहे की हार्दिक आणि माहिका एकत्र आहेत.
हार्दिक – नताशाचा घटस्फोट :
कोविड काळात (2020) लग्न केलेल्या हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविकने गेल्या वर्षी जुलैमध्ये घटस्फोटाचा निर्णय घेतला. “चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर परस्पर संमतीने वेगळं होणं आमच्या दोघांच्या हिताचं आहे,” असे हार्दिकने सांगितले होते. त्यानंतरच हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्याविषयी नवनवीन चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माच्या रिलेशनशिपबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. सध्या हे सर्व सोशल मीडिया पोस्ट्स, सेल्फी आणि चाहत्यांच्या अंदाजांवर आधारित आहे. मात्र, व्हायरल फोटो आणि सोशल मीडियावरील हिंट्समुळे या दोघांचे नाव चर्चेत नक्कीच आले आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रात सरकारी नोकरीचा पॅटर्न बदलणार? ‘हा’ नवा पॅटर्न लागू होण्याची शक्यता
“लग्न करीन” म्हणून मैत्रिणीला लॉजवर नेलं, शरीर संबंधाची मागणी केली, नकार देताच…
‘या’ तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस; हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांचं रेस्क्यू