सोशल मीडियावर नेहमीच अनेक मनोरंजक आणि आश्चर्याने भरलेले व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे अनेक अशी दृश्ये शेअर केली जातात ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. आताही इथे एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एका बैलाने माणसावर जोरदार हल्ला चढवल्याचे दृश्य दिसून आले. बैल आपल्या शिंगांनी व्यक्तीची अशी अवस्था करतो की पाहून सर्वांचाच थरकाप उडतो. या घटनेचा व्हिडिओ(Video) आता सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून यात नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

व्हायरल व्हिडिओमध्ये(Video) आपण पाहू शकता यात दिसत की, बैल माणसाचा पाठलाग करत क्षणार्धातच त्याला त्याच्या शिंगांनी उचलतो आणि हवेत फेकतो, नंतर तो जमिनीवर पडताच त्याला पायांनी तुडवायला जातो. तो माणूस गंभीर जखमी होतो, परंतु जवळच उभी असलेली एक कार त्याचा जीव वाचवते. तो हुशारीने गाडीखाली जातो, जिथे बैल त्याला स्पर्शही करू शकत नाही.
बैल थोडा वेळ इकडे तिकडे फिरतो आणि नंतर तो तिथून निघून जातो. बैलाला जाताना पाहताच माणूस लगेच गाडीबाहेर येतो आणि अडखळत अडखळत तिथून निघून जातो. हा व्हायरल व्हिडिओ(Video) आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून लोक वेगाने व्हिडिओला शेअर करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @Brutal_0s नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
— Brutal Clips 🔞 (@Brutal_0s) September 14, 2025
एका युजरने लिहिले आहे, “तो खरोखर भाग्यवान होता की तो गाडीने वाचला. आणि तो अजूनही बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून तो खरोखर मूर्ख आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “इतक्या लवकर बाहेर का पडला?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बैलाला फक्त खेळायचे आहे हे स्पष्ट आहे”.
हेही वाचा :
10वी -12वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये हिंदी दिवस उत्साहात संपन्न
शिल्पा शेट्टीच्या पतीचा पाय आणखी खोलात? अभिनेत्रीचीही चौकशी होणार?