अभिनेत्री(actress) शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यामागे असणारी संकटं संपण्याचं नाव घेत नसून उलटपक्षी त्यात आणखी भर पडताना दिसत आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या Economic Offences Wing (EOW) या शाखेनं सोमवार, 15 सप्टेंबर 2025 रोजी राज कुंद्राची तब्बल पाच तास कसून चौकशी केली. जिथं बँक स्टेटमेंट आणि इतर अनेक आर्थिक उलाढालीसंदर्भात त्याला प्रश्न विचारण्यात आले.

राज कुंद्राची चौकशी ही कारवाई एका खासगी वित्त संस्था असलेल्या दीपक कोठारी यांच्या तक्रारीवरून करण्यात आली. जिथं त्यांनी 60.48 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप कुंद्रावर केला. संबंधित प्रकरणी राज कुंद्राला पुन्हा एकदा पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली
तक्रारदार दीपक कोठारी यांच्या सांगण्यानुसार 2016 मध्ये ‘बेस्ट डील टीव्ही’ या राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी(actress) यांच्या मालकीच्या कंपनीत गुंतवणुकीची विचारणा करण्यात आली होती. कंपनीत सुमारे 75 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणुकीची विनंती करताना, निश्चित परतावा दिला जाईल असं त्यांना आश्वासनही देण्यात आलं होतं.
कोठारी यांनी त्यावर विश्वास ठेवून दोन टप्प्यांत 60.48 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र काही महिन्यांतच शिल्पा शेट्टीनं कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आणि कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली, खुद्द कोठारी यांनी आपल्या तक्रारीत ही बाब नमूद केली.
कोठारी यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी सुरू केली आणि त्यानंतर राज कुंद्राविरोधात गुन्हा दाखल केला. ज्या धर्तीवर त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं. सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान त्याचे सर्व जबाबब सखोलपणे तपासले गेले असून, पुढील आठवड्यात अधिक माहिती घेण्यासाठी त्यांना पुन्हा समन्स पाठवण्यात येणार आहे.
शिल्पा शेट्टीनं कंपनीच्या संचालक पदावरून राजीनामा दिला असला, तरी गुंतवणूकदारांशी झालेल्या व्यवहारांमध्ये तिचा सक्रिय सहभाग असल्याचा आरोप असल्या कारणानं तपास यंत्रणा शिल्पा शेट्टीचीही चौकशी करू शकतात असं कायदे तज्ज्ञांतं मत आहे. त्यामुळं आता या प्रकरणाला पुढं नेमकं कोणतं वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
10वी -12वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये हिंदी दिवस उत्साहात संपन्न
करदात्यांना मोठा दिलासा; ‘या’ कारणामुळे आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढवली?