श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये १४ सप्टेंबर च्या निमित्ताने हिंदी दिनाचा कार्यक्रम संपन्न(celebrated) झाला. प्रमुख पाहुणे श्री पंडित बापू कांबळे, सहाय्यक शिक्षक इचलकरंजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व श्री.प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले.

स्वागत गीत प्रशालेमधील संगीत शिक्षिका ए .ए.रानडे व गीत मंचाने सादर केले .स्वागत व प्रास्ताविक सौ एन.पी.राणे यांनी केले.प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ ए.एस.काजी यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला .एन.एम. कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला(celebrated).
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पी .बी.कांबळे सर यांनी हिंदीचा इतिहास व हिंदी भाषेचा प्रचार आणि आधुनिक जीवनामध्ये हिंदीचे महत्त्व या विषयावर प्रकाश टाकला. त्यानंतर हिंदी दिनानिमित्त निबंध स्पर्धा व कथाकथन स्पर्धेमध्ये नंबर आलेल्या मुलींना बक्षीस वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ए एस काजी मॅडमनी हिंदी भाषा सरल ,सुबोध आणि मधुर कशी आहे हे सांगितले. आर.जे.निऊंगरे मॅडमनी आभार मानले. सौ.व्ही बी. कागले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
हेही वाचा :
भारत-पाकिस्तान सामन्यावरून महाराष्ट्राचे राजकारण पेटले
हार्दिक पांड्या आता ‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय? सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण!
करदात्यांना मोठा दिलासा; ‘या’ कारणामुळे आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढवली?