पिंपरी चिंचवडमधील वाकड येथील फिनिक्स मिलेनियम मॉलमध्ये महिला सुरक्षा रक्षकावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेनं(woman) पोलिसात तक्रार दाखल केली असून, आरोपीवर वाकड पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला(woman) मॉलमधील खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होती. आरोपी मनोज धोंडीराम कदम हा आयटी ऑफिसमध्ये कर्मचारी आहे. महिलेनं तक्रारीत सांगितले आहे की, मॉलमध्येच त्याची महिला रक्षकासोबत ओळख झाली. नंतर आरोपीने महिलेसोबत अश्लील वागणूक सुरू केली आणि प्रोमोशनची ऑफर देत दबाव टाकला.
पीडित महिलेनं सांगितले की, आरोपीने महिलेसोबत जबरदस्ती करत बलात्काराचा प्रयत्न केला. या घटनेनंतर महिला त्वरित वाकड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. पोलीसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 74, 351 (2), 351 (3) नुसार गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी सुरक्षा वाढवली आहे आणि पुढील तपास करत आहे.
हेही वाचा :
10वी -12वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!
शिल्पा शेट्टीच्या पतीचा पाय आणखी खोलात? अभिनेत्रीचीही चौकशी होणार?
बैलाचा माणसावर भयंकर हल्ला, घाबरून लपला गाडीच्या खाली अन्… Video Viral