पुण्यातील बुधवार पेठेमध्ये एक अत्यंत विचित्र प्रकार घडला आहे. येथील तीन वेश्यांनी एका तरुणाला(young man) बेदम मारहाण केली असून प्रकरण थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहचलं आहे. विशेष म्हणजे या मारहाणीसाठी कारणीभूत ठरलाय तो एक पासवर्ड! नेमकं घडलं काय आणि याबद्दल पोलिसांनी काय माहिती दिली आहे सविस्तरपणे जाणून घेऊयात…

पुण्यातील बुधवार पेठेत तरुणाला(young man) तीन वेश्यांनी बेदम मारहाण केली. येथील वेश्या वस्तीत वेश्यागमनासाठी गेलेल्या तरुणाला अंबटशौक चांगलाच महागात पडला. तीन वेश्यांनी या तरुणाला अगदी लाथा-बुक्यांनी मारहाण केली. बुधवार पेठेमध्ये जाऊन या तरुणाने वेश्यांसोबत शरीरसंबंध ठेवले. मात्र त्यानंतर पैसे देण्याची वेळ आली तेव्हा त्याने पेमेंट अॅप्लिकेशनचा पासवर्ड मी विसरलोय असं सांगितलं. हा तरुण पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचं वाटल्यानंतर संतापलेल्या तिघींनी या तरुणाला चांगलाच धडा शिकवला. ही घटना शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली.
या घटनेची माहिती समोर आल्यानंतर केवळ बुधवारपेठ नाही तर पुण्यात बऱ्याच ठिकाणी या बातमीची चर्चा आहे. याप्रकरणामध्ये फरासखाना पोलिस ठाण्यामध्ये तरुणाला मारहाण करणाऱ्या तीन वेश्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या वेश्या महिलांची ओळख पटली असून आरोपींपैकी दोघी बुधवारपेठेत राहणाऱ्या आहेत. 32 वर्षीय तमन्ना, 34 वर्षीय तनुजा आणि 32 वर्षीय सोनियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तनुजा आणि सोनिया बुधवारपेठेत वास्तव्यास आहेत. बेदम मारहाण झाल्यानंतर या 39 वर्षीय तरुणाने फरासखाना पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी नेमका घटनाक्रम सांगितला आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पीडित तरुण(young man) वेश्यागमनासाठी बुधवार पेठेमधील नवीन बिल्डिंगमध्ये गेला होता. तो तमन्नासोबत गेला. तिने या तरुणाला रक्कम ऑनलाईन पाठविण्यास सांगितलं. मात्र या तरुणाला त्याच्या ऑनलाईन पेमेंट अॅपचा पासवर्ड आठवत नव्हता. त्याने पासवर्ड आठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला पासवर्ड आठवत नव्हता. त्यामुळे हा तरुण पैसे द्यायला टाळाटाळ करतोय असं वाटून या महिलेचं आणि तरुणाचं भांडण सुरु झालं, असं पोलिसांनी सांगितलं.
चिडलेल्या आरोपी महिलेने ‘पैसा नही तो ईधर काय को आया?’ असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर अन्य दोन आरोपी तनुजा आणि सोनिया यांनी शिवीगाळ करत या तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणाने याप्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक पुनम पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.
हेही वाचा :
18 वर्षांहून कमी वयाच्या युजर्ससाठी लवकरच लाँच होणार ChatGPT चं नवं वर्जन!
टॉपलेस फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सगळे बघतच बसले!
‘सिद्धार्थ माझ्या भावा…’, जिवलग मित्राच्या निधनानंतर रितेश देशमुख भावूक