बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी नुकतेच आपल्या इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ(video) शेअर केला, ज्यामध्ये एक ॲम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अडकलेली दिसत आहे. जॅकी यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत जॅकी श्रॉफ म्हणाले की, ”लोकांनी संवेदनशीलता दाखवली पाहिजे आणि रुग्णवाहिकेसाठी वेगळा मार्ग बनवला पाहिजे.”

व्हिडिओमध्ये(video) जॅकी श्रॉफ सांगतात की, ” यामध्ये बसलेला रूग्ण रस्त्यातच मरेल, जर त्या जर त्याला वेळेत रस्ता मिळाला नाही, तर त्याचा जीव जाऊ शकतो.” जॅकी यांनी प्रेक्षकांना रुग्णवाहिकेला मार्ग देण्याचं महत्त्व सांगितलं आणि आपल्या पोस्टमधून एक महत्वाचा सामाजिक संदेश दिला आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांनी जॅकी श्रॉफ यांना साथ दिली आहे. एका युजरने लिहिलं आहे “दादा, रस्त्यांच्या परिस्थितीवरही एक व्हिडिओ बनवा. इतके खड्डे आहेत की अर्धं ट्रॅफिक त्यातच अडकतं, आणि मग रुग्णवाहिका वेळेवर पोहोचतच नाही.”दुसऱ्या युजरने म्हटलं –
“वाह दादा, क्या बात है!” असे अनेकांनी जॅकी यांच्या संवेदनशीलतेचं कौतुक केलं आहे.
जॅकी श्रॉफ हे सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असून त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांनी नायकाची भूमिका साकारलीच पण त्याचबरोबर ते खलनायकाच्या भूमिकेतही दिसले. त्यांच्या प्रत्येक भूमिका लोकप्रिय झाल्या. जॅकी श्रॉफ अनेक सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करतात आणि त्यांचं मत मांडतात. त्याचबरोबर ते सोशल मीडियावरसुद्धा कायम सक्रीय असतात. हल्लीच प्रदर्शित झालेल्या ‘हंटर – २’ या वेब सीरीजमध्ये दिसले होते. त्यांनी या वेब सीरीजमध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर आता ते ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या सिनेमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
हेही वाचा :
ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या! मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना मोठं गिफ्ट
1 कोटी कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांची दिवाळी; पुढच्या महिन्यातील पगारात 58% …