सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं सोमवारी रात्री निधन(death) झालं. अवघ्या 49 व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. सिद्धार्थ शिंदे हे अभिनेता रितेश देशमुखचे चांगले मित्र होते.

दोघे वर्गमित्र होते अशी माहिती स्वत: रितेश देशमुखने सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत दिली आहे. आपल्या मित्राच्या निधनानंतर रितेश देशमुख भावूक(death) झाला असून पोस्ट शेअऱ केली आहे. विशेष म्हणजे रितेश देशमुखच्या आगामी ‘राजा शिवाजी’ चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका साकारली होती.

“हे तुम्हा सर्वांसोबत मी फार जड अंतकरणाने शेअर करत आहे. सिद्धार्थ शिंदे, माझा खास वर्गमित्र, सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ विधिज्ञ, खूप दयाळू, नम्र, नेहमीच उबदार हास्य आणि अढळ पाठिंबा देणारा होता,” असं रितेशने सांगितलं आहे.

“सहा वर्षांपूर्वी, जेव्हा त्याला मी आपल्या प्रिय छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवत आहे समजलं तेव्हा त्याने मला फार उत्साहात फोन केला होता. “रितेश, कृपया मला ‘राजा शिवाजी’चा भाग होऊ दे, जरी पडद्यावर छोटा सीन असला तरी.” शिवरायांबद्दलचे त्याचे प्रेम हेच होते,” असं रितेशने सांगितलं आहे.

“काही महिन्यांपूर्वी, आम्ही संजय दत्त सरांसोबत दोन सुंदर दिवस एकत्र शूटिंगमध्ये घालवले. त्याच्या उपस्थितीने सेटवर एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत होती. आज त्याचा सीन एडिट करत असताना, त्याने किती सुंदर काम केलं आहे हे पाहत हसत असताना, हा आनंद त्याच्यासोबत शेअर करण्यासाठी फोन करावा असं मला वाटलं.

मग धक्कादायक बातमी आली, की तो आता आपल्यात नाही. आपण एकत्र हा चित्रपट पाहत आहोत, हसत आहोत, आठवणी काढत आहोत याची कल्पना करतानाही माझं मन भरुन येत आहे. नियतीने काही वेगळंच ठरवलेलं असतं,” अशी खंत त्याने व्यक्त केली आहे.

“सिद्धार्थ, माझ्या भावा तू एक दुर्मिळ व्यक्ती होतास. तुझ्या कुटुंब आणि प्रियजनांप्रती माझी मनापासून सहानुभूती. शांती लाभो, प्रिय मित्रा – तू आमच्या हृदयात कायमचा जिवंत राहशील,” असं त्याने पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.

हेही वाचा :

सांगलीत पॉलिशच्या बहाण्याने तीन लाखांचे सोने लंपास

रीलच्या नादात तरुणाला दोऱ्याने लटकवलं, मुलीला पाण्यात बुडवलं; Video Viral

18 वर्षांहून कमी वयाच्या युजर्ससाठी लवकरच लाँच होणार ChatGPT चं नवं वर्जन!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *