उत्तर प्रदेशातील बरेली येथे अभिनेत्री(actress) दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. एन्काऊंटरमध्ये दोन्ही आरोपी ठार झाले आहेत. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

रवींद्र (रोहतक) आणि अरुण (सोनीपत) अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. 17 सप्टेंबर 2025 रोजी यूपी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) ने केलेल्या कारवाईत गाझियाबादच्या टेक्नो सिटीमध्ये हा एन्काऊंटर झाला. दिशा पटानीच्या(actress) घरावर गोळीबार करणारे मुख्य गोळीबार करणारे मारले गेले. रवींद्र हा रोहतकचा रहिवासी होता आणि अरुण हा सोनीपतचा रहिवासी होता.
आरोपी रोहित गोदरा-गोल्डी ब्रार टोळीशी जोडलेले असल्याचे सांगितले जात आहे. एसटीएफ पथकाने घटनास्थळावरून एक ग्लॉक, एक जिगाना पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त केली आहेत.
12 सप्टेंबर रोजी पहाटे मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी बरेलीच्या सिव्हिल लाईन्स परिसरात दिशा पटानी यांच्या कुटुंबाच्या घराबाहेर 8 ते 10 राउंड गोळीबार केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, पहाटे 3:45 च्या सुमारास हा गोळीबार झाला, जरी या घटनेत कोणीही जखमी झालेने नाही.
दिशा पटानीचे वडील जगदीश सिंह पटानी (निवृत्त डीएसपी) यांनीही या घटनेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली . त्यांनी तिला पूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले आणि अधिकाऱ्यांना या प्रकरणाची त्वरित चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले.
हल्ल्याचा तपास करणाऱ्या पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, बरेली पोलिसांनी अशा टोळ्या सक्रिय असलेल्या राज्यांमधील पोलिसांकडून माहिती मागवली होती. या संदर्भात, पंजाब आणि राजस्थानमधील 335 आणि हरियाणा आणि दिल्लीतील 180 गुन्हेगारांचे फोटो अल्बम सापडले. पोलिसांनी आतापर्यंत 2500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले होते.
हेही वाचा :
कुरळे केसांना सांभाळणे जातेय कठीण?
सावधान! या भाज्या कधीही फ्रिजमध्ये ठेवू नका;
पावसाळ्यात पिठात किडे होण्यामुळे वैतागला आहात?