साउथच्या चित्रपटांनी गेल्या काही काळात बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. विशेषतः तेलुगू चित्रपट आजकाल प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनले असून, एकामागोमाग एक चित्रपट(film) प्रदर्शित होत आहेत आणि बहुतेक चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उत्कृष्ट कथा आणि अभिनयामुळे प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. याच दरम्यान ‘लिटिल हार्ट्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

‘लिटिल हार्ट्स’ हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि अवघ्या 10 दिवसांत छोट्या बजेटच्या या चित्रपटाने उत्कृष्ट कमाई करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. कथा आणि अभिनयामुळे प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत.

आजकाल बॉक्स ऑफिसवर 100-500 कोटींच्या चित्रपटांनाही(film) कमाईसाठी संघर्षाचा सामना करावा लागतो. पण साउथच्या सर्वात कमी बजेट असणाऱ्या या चित्रपटाने चमत्कार घडवला आहे. ‘लिटिल हार्ट्स’च्या बजेटकडे पाहिलं तर IMDb नुसार हा चित्रपट फक्त 3 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आला होता. पण त्याने सुमारे 32 कोटी रुपयांची कमाई करून स्वतःचं बजेट वसूल करत मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. यावरून सिद्ध होतं की जर कथा आणि अभिनय दमदार असेल तर बजेटचा फारसा फरक पडत नाही.

सध्या तेलुगू चित्रपटसृष्टीत कोणताही मोठा चित्रपट रिलीज होत नाही. त्यामुळे ‘लिटिल हार्ट्स’ला प्रेक्षकांचा पाठिंबा टिकून राहण्याची शक्यता जास्त आहे. पुढे जे मोठं नाव येणार आहे ते म्हणजे पवन कल्याणचा ‘दे कॉल हिम ओजी’ त्यामुळे त्यापर्यंत ‘लिटिल हार्ट्स’चा ट्रेंड सुरू राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

‘लिटिल हार्ट्स’ चित्रपटाची कथा एका युवकाभोवती फिरते जो प्रवेश परीक्षामध्ये नापास होतो. नंतर तो एका कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतो आणि तिथे एका मुलीला भेटतो. सुरुवातीला तिच्या नकारानंतरही तो तिचं मन जिंकण्याचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. ही कथा युवकांच्या संघर्षाची, प्रेमाची आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन साई मार्तंड यांनी केले आहे. मुख्य भूमिकांमध्ये मौली तनुज प्रशांत, शिवानी नगरम आणि राजीव कनकतला यांचा समावेश आहे. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे.

हेही वाचा :

पत्नीच्या बहिणीला घेऊन पळाला, दुसऱ्याच दिवशी त्याची बहिण…

‘तो वाटेतच मरेल…’ जॅकी दादांनी शेअर केला ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेचा व्हिडिओ

मोठी बातमी! मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, मनोज जरांगे पाटलांनी केली घोषणा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *