‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात कंटेंट क्रिएटर सूरज चव्हाणने सर्वांना मागे टाकत विजेतेपद मिळवलं. 70 दिवसांच्या या रिअॅलिटी शोमध्ये सूरजने(entertainment news) त्याचा हटके अंदाज, विनोदबुद्धी आणि प्रामाणिक खेळ यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली होती. विजेता ठरल्यानंतर त्याला मिळालेली प्रसिद्धी आणि चाहत्यांकडून मिळालेला पाठिंबा हा त्याच्या कारकिर्दीतील मोठा टर्निंग पॉइंट ठरला.

सूरजच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रेक्षकांमध्ये कायमच उत्सुकता राहिली आहे. शोमध्ये असतानाच त्याने आपल्या ब्रेकउपविषयी मोकळेपणाने सांगितलं होतं. त्यावेळी त्याने आपल्या पूर्वीच्या नात्याबद्दल बोलताना ‘गुलिगत धोका’ अशी टर्म वापरली होती. ही टर्म इतकी व्हायरल झाली की चाहत्यांनी ती सूरजच्या ओळखीचा एक भागच बनवून टाकली. शिवाय, आपल्या एक्सबद्दल तो सोशल मीडियावर अनेक रील्समधूनही भाष्य करत असे.
मात्र, आता सूरजच्या(entertainment news) आयुष्यात पुन्हा प्रेम परतलं आहे का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण अलीकडेच त्याने एका रहस्यमय मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघेही पारंपरिक दक्षिण भारतीय पोशाखात दिसत आहेत. मुलीचा चेहरा झाकलेला असला तरी पोस्टसोबत दिलेल्या हार्ट इमोजीने चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
सोशल मीडियावर या पोस्टनंतर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. अनेकांनी “सूरज, तू आता सेटल होतोयस का?”, “लग्न ठरलं का?”, “खूप खूप शुभेच्छा” अशा कमेंट्स केल्या आहेत. काही चाहत्यांनी तर सूरजच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव करत त्याला आयुष्यातील नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सूरजचा प्रवास केवळ रिअॅलिटी शोपुरता मर्यादित राहिला नाही. बिग बॉसमध्ये विजेता ठरल्यानंतर त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ या सिनेमात त्याने नायकाची भूमिका साकारली. 25 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही आणि सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. बिग बॉसच्या घरातल्या लोकप्रियतेच्या जोरावर हा चित्रपट हिट ठरेल, असा निर्मात्यांचा विश्वास होता, पण निकाल उलट लागला.
चित्रपट फ्लॉप झाल्यानंतरही सूरजने हार मानलेली नाही. तो सतत सोशल मीडियावर सक्रिय असून, आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहतो. विविध रील्स, अपडेट्स आणि मजेशीर व्हिडीओंद्वारे तो प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर त्याने मिळवलेलं फॅन बेस अजूनही तितकंच मजबूत आहे.
आता त्याच्या नव्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये लग्न आणि प्रेमाच्या चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे. काहींना वाटतं की हा फोटो केवळ एक क्रिएटिव्ह शूट आहे, तर काहींच्या मते सूरज खरंच रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र, याबाबत सूरजकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
हेही वाचा :
सोने-चांदी खरेदीची सुवर्णसंधी! जाणून घ्या आजचे दर
पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने, महामुकाबला की महावाद?
प्रभासच्या मेहुण्याच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण; शरद पवारांच्या पक्षातील नेत्याला अटक