मराठी अभिनेत्री(actress) प्रिया बापटची वेब सीरिज ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ मधला लेस्बियन किसिंग सीन सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या सीनमुळे तिला काही प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला, मात्र प्रियाने ट्रॉलर्सना दिलेलं उत्तर खूप स्पष्ट आणि सडेतोड होतं.

‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या पहिल्या सीझनमध्ये प्रियाने एक बोल्ड सीन साकारला होता. त्यानंतर चाहत्यांबरोबरच सोशल मीडियावर काही लोकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. या पार्श्वभूमीवर प्रियाने सांगितलं, ‘पूर्वी मी ट्रोलिंगवर रिऍक्ट करायचे, पण आता मी मनावर घेत नाही.
पहिल्या सीझननंतर मला बऱ्याच नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझननंतर त्याच लोकांनी माझं कौतुकही केलं.’ प्रियाने तिच्या कामावर श्रद्धा आणि प्रामाणिकपणावर भर देत सांगितलं, ‘माझ्या कामावर मी किती श्रद्धा ठेवावी, मी प्रामाणिकपणे मेहनत करत राहावं एवढंच माझ्या हातात आहे.
मराठी अभिनेत्री(actress) हिंदीत गेली की तिला काम मिळावं म्हणून इंटिमेट सीन केले असं म्हटलं जातं, पण दीपिका पदुकोणसारख्या कलाकारांनी ‘गेहराइयाँ’मध्ये तसे सीन केले तरी ट्रोल केलं जात नाही.’ तिने लक्ष वेधलं की, लोक कलाकाराच्या कामाकडे किंवा परफॉर्मन्सकडे का पाहत नाहीत? प्रियाच्या मते, तिला विचारला जातो,’इंटिमेट सीन केलेस, तुला कसं वाटलं?’ परंतु इतर भाषिक कलाकारांनी अशा सीन केले तर त्यांच्याबाबत प्रश्न का नाही विचारला जातो?
प्रियाने स्पष्ट केलं की, ‘मग आपणच ते प्रश्न विचारून अधोरेखित का करतो? मला त्यावर चर्चा करण्याचं महत्त्व वाटत नाही. कामाचा भाग म्हणून मी एखाद्या सीनमध्ये रडते तसंच दुसऱ्या सीनमध्ये काम म्हणून इंटिमेट सीनही करते.’ अभिनेत्रीच्या या वक्तव्यातून तिच्या कामावरील दृढ श्रद्धा, व्यावसायिक दृष्टिकोन आणि ट्रोलिंगला तिने दिलेली सडेतोड प्रतिक्रिया दिसून येते.
प्रियाने आपल्या कामात प्रामाणिकपणा आणि मेहनत दाखवून दिला असून, तिचा अभिनय आणि समर्पण चाहत्यांना कायमच आठवणीत राहणार आहे. तुमच्या दृष्टीने हे वक्तव्य हा फक्त एका कलाकाराच्या सीनविषयी नव्हे, तर सिनेमॅटिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून कलाकारांच्या कामावरील आदर व समज यावरही प्रकाश टाकते.
हेही वाचा :
आयुष्यात येणारी खरी खोटी माणसं कशी ओळखवीत? श्री स्वामी समर्थांचा मोलाचा सल्ला
कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरातील तळघरात दडलंय तरी काय?
वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू