रहस्य, हास्य आणि कौटुंबिक नातेसंबंधांचा मेळ (movie)साधणारा “स्मार्ट सुनबाई” हा सिनेमा २१ नोव्हेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नवा अनुभव ठरणार आहे.

रहस्य, हास्य आणि भावबंधांचा मेळ साधणारा(movie) नवा मराठी सिनेमा “स्मार्ट सुनबाई” प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे व गार्गी निर्मित हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. कार्तिक दोलताडे पाटील सह-निर्माता असलेल्या या सिनेमाचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित झाले असून, त्यानेच प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.
पोस्टरवर काही कलाकार शहरी लुकमध्ये तर काही ग्रामीण पार्श्वभूमीत दिसत आहेत. या वैविध्यामुळेच कथेतील गूढतेला अधोरेखित केले गेले असून, चाहत्यांच्या मनात “ही स्मार्ट सुनबाई कोण आणि तिच्या आयुष्यात काय घडणार आहे?” असा प्रश्न निर्माण झाला आहे. या चित्रपटात रोहन पाटील, संतोष जुवेकर, भाऊ कदम, मोहन जोशी, दीपक शिर्के, अंशुमन विचारे, विनम्र बाबल, सायली देवधर, प्राजक्ता गायकवाड, किशोरी शहाणे, उषा नाईक आदींसह दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. कलाकारांची दमदार केमिस्ट्री हा या सिनेमाचा मोठा आकर्षणबिंदू ठरणार आहे.
चित्रपटाची कथा व लेखन योगेश शिरसाट यांनी केले असून, संगीतकार विजय नारायण गवंडे आणि साई–पियुष यांनी बहारदार संगीत दिले आहे. गीतकार वैभव देशमुख आणि अदिती द्रविड यांनी गाणी लिहिली आहेत, तर अजय गोगावले, वैशाली माढे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र आणि उर्मिला धनगर यांनी या गाण्यांना आपले स्वर दिले आहेत. संगीत, अभिनय आणि कथानक यांचा अनोखा संगम प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.
दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांच्या मते, प्रत्येक सुनेला “स्मार्ट सुनबाई” होण्यासाठी हा चित्रपट प्रेरणादायी ठरेल. रहस्य, थरार, हास्य आणि कौटुंबिक नातेसंबंधांचा सुंदर मेळ साधणारा “स्मार्ट सुनबाई” हा नवा चित्रपट २१ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहे.
हेही वाचा :
सुपर फोरसाठी 4 संघ फिक्स,
अखेर श्रीलंकेने अफगाणिस्तानला केले नेस्तनाबूत,
मारुती सुझुकीच्या कार ४६,४०० ते १.२९ लाख रुपयांपर्यंत स्वस्त,