काल लोकसभेत निर्मला सितारामन यांनी नवीन आयकर विधेयकाची माहिती दिली.(Tax)लोकसभेत या विधेयकाला मंजुरी दिली आहे. या नवीन आयकर विधेयकात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामुळे करदात्यांना फायदा होणार आहे. यामध्ये टॅक्स भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे.हे नवीन आयकर विधेयक जुन्या १९६१ ची जागा घेणार आहे. या नवीन विधेयकात करप्रणाली अधिक सोपी आणि पारदर्शक होणार आहे. यामुळे तुम्हाला आयटीआर फाइल करणेही सोपे होणार आहे. या नवीन विधेयकात कोणते फायदे आणि सूट मिळणार आहे ते जाणून घेऊयात.

नवीन आयकर विधेयकात टॅक्स स्लॅबमध्ये बदल केला आहे. यामध्ये आता १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर टॅक्सपासून सूट मिळणार आहे. याआधी ही मूदत ७ लाख रुपये होती.
टॅक्स रिफंड
आता तुम्ही उशिरा आयटीआर फाइल केला तरीही त्यांना रिफंड मिळणार आहे. (Tax)याआधी जर तुम्ही मुदतीपूर्वी आयटीआर फाइल केला नाही तर त्यांना रिफंड मिळत नव्हता.
डिव्हिडंडवर सवलत
एका कंपनीला दुसऱ्या कंपनीकडून जो डिव्हिडंड मिळतो. त्यातील ८० लाखांवर आता टॅक्स लागणार नाहीये.

नियमांत बदल
रिकाम्या घरांना दिलासा
घर रिकाम असेल तर त्यावर अंदाजे भाडे समजून टॅक्स लावण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
हाउस प्रॉपर्टीवर कपात
हाउस प्रॉपर्टीवर घरभाड्याच्या उत्पन्नातून आणि महापालिकेचा कर, कर्जाचे व्याज कमी केले तर उरलेल्या संपूर्ण रक्कमेवर ३० टक्के सूट मिळणार आहे.
पेन्शन
आता सरकारी पेन्शधारकांना फायदा होणार आहे. (Tax)जे सरकारी कर्मचारी नाही त्यांना कम्युटेड टॅक्समध्ये सूट मिळणार आहे.
हेही वाचा :
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बेस्ट वीज विभागाचा सर्वात मोठा निर्णय
एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार! ‘हा’ बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार
डे-केअरमध्ये 15 महिन्याच्या मुलीचा गळा दाबणे, तोंडात पेन्सिल घालणे, शरीरावर चावा घेण्याचा घडला भयंकर प्रकार