लातूर – लातूर शहरात मध्यरात्री(midnight) झालेल्या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. गाडीला कट का मारला? या किरकोळ कारणावरून तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात अनमोल कवठे (सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेली सोनाली भोसले ही गंभीर जखमी असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना बायपास रोडवर, पाच नंबर चौक ते औसा मार्गावर मध्यरात्री(midnight) घडली. हल्लेखोराने अनमोलच्या गळ्यावर व मानेवर सपासप वार केले. चाकू आरपार गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सोनालीवरही आरोपीने छातीवर तीन आणि पाठीवर दोन वार केले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी शुभम नावाच्या आरोपीला अटक केली आहे. मात्र या भयानक हत्याकांडामागे अजून कोणाचा हात आहे का, याचा तपास पोलिस सुरू आहेत.

मृत अनमोल कवठे हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता होता. त्याच्यावर खंडणीसह पाच गुन्हे दाखल असल्याची व त्याला याआधी तडीपार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे लातूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकार देणार बिनव्याजी 1 लाखांचे कर्ज
भरधाव कारची ट्रेलरला जोरदार धडक; पाच जणांचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी
MIDC मध्ये वेश्या व्यवसाय २ तरूणींच्या मदतीनं देहविक्री सुरू