मलकापूर : भरधाव कारची ट्रेलरला जोरदार धडक बसल्याने अपघात(accident) झाला. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५३ वर चिखली-रमथमनजीक घडली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून बचावकार्य सुरु करण्यात आले.एका चारचाकी वाहनाने प्रवासी जळगावकडून नागपूरकडे येत होते. महामार्गावर मलकापूर तालुक्यातील चिखली-रमथमनजीक चारचाकीने समोरील ट्रेलरला जबर धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच, एमआयडीसी पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत व गंभीर जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. त्यात गंभीर जखमी असलेल्या चार जणांना जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले. तर एकाला बुलढाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते.

दरम्यान, अपघात(accident) घडल्यानंतर पोलिसांनी महामार्गावर ठप्प पडलेली वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरा जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे व अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, नायब तहसीलदार श्रीकृष्ण उगले आदींनी घटनास्थळी व उपजिल्हा रूग्णालयात भेट दिली.मृतांमध्ये कारचालक साजीद अजीज बागवान (वय ३०, रा. भुसावळ, जि. जळगाव, खान्देश) व संतोष तेजराव महाले (वय ४०, रा. चिखली, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव), मृत महिला तानिया साजिद बागवान (वय २८, रा. भुसावळ) व झूमा सिकंदर (वय ४८, रा. भुसावळ, मूळ गाव नादिया, पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे. तर उर्वरित आणखी एका मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले होते. या अपघातात जखमी पंकज दिलीप गोपाळ (२२. रा. नांद्रा हवेली, ता. जामनेर, जि. जळगाव). दीपिका विश्वास (३०, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) टीना अंदाजे अजय पाटील (४५, रा. भुसावळ) व एक अनोळखी महिला यांचा समावेश आहे. या घटनेबाबत अक्षय भास्कर सोनवणे (२२, रा. चिखली, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यावरून आरोपी मृत चालक साजिद बागवान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
एसटी व्यक्तींच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर मिळणार नोकरी….
हुंड्याच्या मागणीला एवढी कंटाळली की थेट छतावरूनच मारली उडी Video Viral
लाडक्या बहिणींवर सरकारचा लेटरबॉम्ब आता ‘या’ महिलांनाच मिळणार दीड हजार