छत्रपती संभाजीनगर | पुढारी वृत्तसेवा – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) हे गरिबांचे वाहतुकीचे मुख्य साधन मानले जाते. अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी एसटी नेहमी तत्पर असते. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ सध्या तब्बल ४३ सवलतीच्या योजना राबवत असून त्यातल्या १७ योजनांत पूर्णपणे मोफत प्रवासाची(travel) सुविधा उपलब्ध आहे.

स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ, दिव्यांग, हिमोफिलिया किंवा डायलिसिसग्रस्त रुग्ण, समाजभूषण पुरस्कार विजेते, अधिस्विकृतीधारक पत्रकार, विविध पुरस्कार प्राप्त खेळाडू यांना या मोफत प्रवास योजनेचा थेट लाभ मिळत आहे.
सवलतींचा तपशील :
१००% मोफत प्रवास : स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ, अमृत ज्येष्ठ, दिव्यांग, गंभीर आजारग्रस्त रुग्ण, पुरस्कार विजेते खेळाडू आदींसाठी एकूण १७ योजना.
७५% सवलत : पाच योजनांचा समावेश.
७०% ते ६६.६७% सवलत : काही निवडक योजना.
५०% सवलत : महिलांसाठी महिला सन्मान योजना, विद्यार्थ्यांना सुट्टीसाठी घरी ये-जा, शैक्षणिक सहली, आजारी पालकांना भेटण्यासाठी प्रवास(travel) अशा नऊ योजनांचा समावेश.
तसेच ४५%, ४०% आणि ३३% सवलतीच्या योजनाही उपलब्ध.

एसटी महामंडळाचे म्हणणे आहे की, या योजनांमुळे समाजातील विविध घटकांना मोठा दिलासा मिळतो. प्रवास खर्च कमी होऊन गरजू प्रवाशांना त्यांच्या गावी, शाळेत किंवा उपचारासाठी वेळेत पोहोचण्यास मदत मिळते. आतापर्यंत लाखो प्रवाशांनी या योजनांचा लाभ घेतलेला आहे.
हेही वाचा :
मध्यरात्री रक्तरंजित थरार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची हत्या….
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकार देणार बिनव्याजी 1 लाखांचे कर्ज
भरधाव कारची ट्रेलरला जोरदार धडक; पाच जणांचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी